(फोटो सौजन्य: X)
सोशल मिडियावर प्राण्यांचे अनेक मजेदार आणि थक्क करणारे व्हिडिओज नेहमीच शेअर केले जातात. हे व्हिडिओ कधी आपल्याला हसवतात, कधी थक्क करतात तर कधी आश्चर्याचा धक्का देऊन जातात. अशातच आता नुकताच सोशला मिडियावर एक मजेदार अन् सर्वांनाच खुश करणारा एक अनोखा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात कुत्र्याचं एक पिल्लू कासवाची नक्कल करताना दिसून आलं. कासवाची हळू आणि जमिनीवर सरपटत चालणारी चाल पाहून पिल्लू आधी थोडं अवाक् झालं आणि मग लगेचचं त्याने त्याची नक्कल करण्याचा निर्णय घेतला. पिल्लाची ही नक्कल आणि प्राण्यांमध्ये सुरु असलेली ही मजा पाहून सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू उमललं आणि लोकांनी हा व्हिडिओ वेगाने शेअर करण्यास सुरुवात केली. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय दिसलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात स्पष्ट दिसते की, घराच्या अंगणात एक कासव आणि कुत्र्याचं पिल्लू रमले आहेत. कासव आपला नेहमीचा वेग साधत हळूहळू, आरामात चालत असतो जे पाहून कुत्र्याचं पिल्लूही अजिबात वेळ न घालवता त्याची नक्कल करण्याता प्रयत्न करतो. तो जमिनीवर लेटून सरपटत अगदी कासव जसा चालत आहे तसा चालण्याचा प्रयत्न करतो. अधनमधन तो कासवाच्या हालचालीकडेही लक्ष ठेवतो. पिल्लाचा हा खोडसरपणा आता चाहत्यांचा मने जिंकत आहे. त्याने कासवाची केलेली नक्कल पाहून अनेकांना हसू अनावर झाले आणि लोकांनी हा व्हिडिओ वेगाने शेअर करण्यास सुरुवात केली. व्हिडिओला आतापर्यंत २ मिलियनहून अधिकचे व्यूज मिळाले आहेत.
Puppy thinks he’s a turtle..🐶 😊 pic.twitter.com/NFdrLyhtga
— Nature & Animals🌴 (@naturelife_ok) September 11, 2025
हा मजेदार व्हिडिओ @naturelife_ok नावाच्या इंस्टाग्राम एक्स अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “कासवाने त्याच्याकडे पाहिले आणि विचार केला, हा माणूस मजेशीर आहे आणि तो मागे वळला ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे हे खूप क्यूट आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे खूप गोंडस आहे! प्राण्यांनी त्यांच्या वागण्या-बोलण्याची नक्कल करणे हे खरंतर बुद्धिमत्तेचे लक्षण आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.