एक डुलकी मृत्यूची! ट्रक चालवताना ड्रायव्हरचा डोळा लागला अन् झाला घात; भयावह अपघाताचा VIDEO VIRAL
Accident Viral Video : सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये डान्स, स्टंट, जुगाड, भांडण, अपघात यांसारखे वेगवेगळे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अपघाताचे तर भयावह व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकदा हे अपघात माणसाच्या चुकीमूळे नियमांचे पालन न केल्यामुळे, काळजीपूर्व वाहन न चालवल्यामुळे होत असतात. सध्या असाच एक भयंकर अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा आफ्रिकन देश झिम्बाब्वेमधील असल्याचे कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक चालवताना ड्रायव्हरचा डोळा लागल्याने भीषण अपघात घडला आहे. सुदैवाने ड्रायव्हरला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. पण अपघात खूप भयंकर होता. या अपघातेच दृश्य ट्रकवर असलेल्या डॅशकॅममध्ये कैद झाले आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक ड्रायव्हर मोठ्या हायवे मार्गावर ट्रक चालवत आहे. ट्रक चालवाताना तो डुलकी घेत आहे. आरामात झोपलेला दिसत आहे. स्टेरिंगवरही त्याता हात नाही. तसेच ड्रायव्हरने सीटबेल्टही लावलेला दिसत नाही. यामुळे ट्रक चालकाशिवाय तसाच पुढे जात असल्याचे स्पष्ट दिसते. पण अचानक समोरुन एक वाहने येते आणि जोरदार धडक होते. यामुळे ट्रक पलटतो, पण सुदैवाने रस्त्यावर जास्त रहदारी नसते यामुळे कोणतीही जीवितहानी होत नाही.पण व्हिडिओमध्ये पाहू शकता की ट्रक जोरात पलटला असून सगळे सामान अस्थाव्यस्थ झाले आहे. तसेच ड्रायव्हरही उलटा पडला आहे.
व्हायरल व्हिडिओ
A shocking dashcam video has emerged online showing a Zimbabwean truck driver falling asleep behind the wheel for almost two minutes. The dashcam captures the driver dozing off while his truck drifts off the road and flips over. pic.twitter.com/bPhY8RhARw — Vehicle Trackers (@VehicleTracker8) September 23, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @VehicleTracker8 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आहे. अनेकांनी गाड्या चालवाताना झोप लागत असल्यास ड्रायव्हिंग करण्याचा सल्ला दिला आहे.
तरुणाची हुल्लडबाजी; मालवाहू ट्रकमागे केलं असं काही ज्याने तुमचाही चढेल पारा, पहा Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.