तरुणाची हुल्लडबाजी; मालवाहू ट्रकमागे केलं असं काही ज्याने तुमचाही चढेल पारा, पहा Video Viral (फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट)
Bike Stunt Video : अलीकडे लोकांना सोशल मीडियावर प्रसिद्धीचे, लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्याचे व्यसन लागले आहे. यामध्ये विशेषकरुन तरुणाईचा समावेश आहे. हे लोक यासाठी आपला जीव देखील धोक्यात घालत आहेत. यामुळे त्यांच्या आसपासच्या लोकांचा जीवही धोक्यात येऊ शकतो याचे भान तरुणांना उरलेले नाही. नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
तरुणांनी असे काही केलं आहे की, पाहून तुमच्याही काळजात धडकी भरले. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन तरुण बाईकवर धोकादायक स्टंट करत आहेत. दोघेही एका ट्रक मागे हात सोडवून बाईक चालवत आहे. ट्रकच्या जवळ जाऊन त्याला हात लावण्याचा प्रयत्न करत आहेत. बाईकचा वेग इतका जास्त आहे की, चुकून जरी ट्रकला धडक बसली तर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. पण मुलांना याटचे जराही भान राहिलेले नाही. याचा व्हिडिओ त्यांच्याच एका मित्राने शूट केला आहे. यापूर्वी देखील असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. काल एक व्हिडिओ व्हायरल होत होता. ज्यामध्ये एक तरुणी धावत्या ट्रेनच्या छतावर चढते पण पुढे तिच्यासोबत असे काही घडते की पाहून कोणचाही थरकाप उडले.
कधी बाईकवर धोकादायक स्टंट, तर कधी धावत्या ट्रेनमधून चढण्याचा उतरण्याचा स्टंट, तर कधी रस्त्याच्या मधोमध रिल बनवण्याचा, झोपण्याचा नको ते उद्योग करण्याा स्टंट करुन लोक आपला जीव धोक्यात घालत आहे. तेही केवळी सोशल मीडियावरील हजार लाईक्स आणि व्ह्यूज साठी. तरुणांच्या मनावर सोशल मीडियाचे भूत सवार झाले आहे. १०-१५ सेंकदची रील तरुणांसाठी जीवापेक्षा महत्त्वाची झाली आहे.
यह खतरा क्यों और किसके लिए?
इनके फट्टे पड़ने चाहिए। pic.twitter.com/l4bpnl8Xvh — Arvind Sharma (@sarviind) September 22, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @sarviind या अकांटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामुळे समाजात चुकीचा संदेश पसरत असल्याचे आणि अशा तरुणांना चाबकाने फटका देण्याचे म्हणत आहेत. तसेच यांच्याकडून बाईक आणि मोबाईलही काढून घेतला पाहिजे असे लोकांचे म्हणणे आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.