(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मिडिया अनेक वेगवेगळ्या रंजक गोष्टींनी भरलेलं आहे. इथे अनेक असे दृश्य शेअर केले जातात जे आपण याआधी कधीही पाहिले नसतील. प्राणी-पक्ष्यांचेही व्हिडिओज इथे शेअर होतात. अशात अलिकडेच इंटरनेटवर एक मजेदार व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात सुंदर दृश्य दिसून आले. वास्तविक व्हिडिओत पूरामुळे सर्व जागी पाणी साठल्याचे दिसले. यात एक मांजरीचं पिल्लूही दिसलं जे आपला जीव वाचवण्यासाठी घराच्या छतावर जाऊन बसलं होतं. अशात पाण्यातून अचानक एक जीव बाहेर येतो आणि तो पिल्लाकडे मदतीचा हात पुढे करतो. पुढे काय घडते, हा प्राणी पिल्लाचा जीव कसा वाचवतो ते चला सविस्तर जाणून घेऊया.
Baby चा फोन येताच आईने मुलीच्या कानशिलात लगावली थप्पड, पण सत्य काही वेगळंच; उघड होताच… Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, एक मांजरीच पिल्लू घाबरून घराच्या छतावर बसल्याचे दिसून आले. त्याच्या आजूबाजूला सर्वत्र पाणी साचलेलं असतं. याचवेळी पाण्यातून एक जीव बाहेर येतो आणि मांजरीच्या पिल्लाकडे बघत राहतो. पिल्लू त्याच्यावर विश्वास ठेवत त्याच्या कमरेवर चढतं आणि काही सेकंदातच तो सुस्साट पाण्यातून पोहत पिल्लाला एका घराकडे घेऊन जातो. कॅमेरा दुसरीकडे वळवताच दुसऱ्या दिशेला आपल्याला एक बोट आणि काही लोक बचावासाठी आलेली दिसून येतात. तो चिमुकला प्राणी मांजरीच्या पिल्लाला बचावासाठी आलेल्या लोकांकडे सोपवतो आणि इथेच व्हिडिओचा शेवट होतो. लोक व्हिडिओतील दृश्ये पाहून खुश झाली आहेत. काहींनी प्राण्यांमध्येही माया दडलेली असते अशी प्रतिक्रिया दिली आहे तर काहींनी व्हिडिओ एआय निर्मित असल्याचे म्हटले आहे.
हा व्हायरल व्हिडिओ @darbaarmeme नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे एआय आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खूप गोड” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आजही त्या प्राण्यांमध्ये माणुसकी आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






