(फोटो सौजन्य: X)
सोशल मिडिया एक असे प्लॅचफाॅर्म आहे जिथे दररोज अनेक व्हिडिओ शेअर केले जातात. यातील बहुतांश व्हिडिओ हे जंगलातील जीवनासंबंधित असतात, ज्यात प्राण्यांचे जीवन चित्रीत केले जाते. अशात नुकताच इंटरनेटवर मजेदार पण तितकाच हादरवणारा असा अनोखा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये व्यक्तीने वाघाचा पोशाख परीधान करुन वाघासोबत प्रँक करण्याचा प्रयत्न केला आहे पण त्याची ही चोरी वाघासमोर फार काळ टिकत नाही आणि सत्य उघड होताच वाघ व्यक्तीवर हल्ला करतो. चला व्हिडिओत पुढे काय घडून आलं ते जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये, तुम्ही पाहू शकता की तो माणूस काही वाघांजवळ वाघाचाच पोशाख घालून जातो. सुरुवातीला सर्व वाघ उत्सुकतेने त्याच्याकडे बघत असतात, त्यांच्या डोळ्यात आश्चर्य स्पष्टपणे दिसते, जणू काही त्यांना व्यक्तीला पाहून ती खरीखुरी वाघीण असावी असे वाटले. पण लवकरच, एका वाघाला संशय येतो. तो व्यक्तीच्या जवळ जातो आणि त्याचा वास घेण्याचा प्रयत्न करतो यातच त्याला व्यक्तीची ओळख पटते आणि त्याला समजत की ही वाघीण नसून दुसरंच कुणी तरी आहे. वाघाला खात्री पटताच तो नखांनी व्यक्तीवर हल्ला करतो. माणूस घाबरतो आणि पळतच वाघाच्या तावडीतून आपली सुटका करु लागतो. तो माणूस धावत असताना, वाघही त्याचा पाठलाग करताना दिसतो. पुढे काय घडते हे मात्र स्पष्ट होत नाही कारण व्हिडिओ इथेच संपतो.
“ don’t get involve in crypto, its too risky “ crypto guys : pic.twitter.com/N3OEoykl1w — naiive (@naiivememe) November 11, 2025
Baby चा फोन येताच आईने मुलीच्या कानशिलात लगावली थप्पड, पण सत्य काही वेगळंच; उघड होताच… Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @Sarcasm1105 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मला खरंच जाणून घ्यायचे आहे की इथे काय घडले, तो माणूस वाचला का?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे खरं आहे की एआय ” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आता काय तो वाचत नसतो”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






