फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात जे पाहून धक्का बसतो. तर अनेकदा मनोरंजक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. हे व्हिडिओ पाहून हसू आवरणे कठीण होऊन जाते. डान्स रील्स, भांडण, जुगाड स्टंट अशा व्हिडिओ शिवाय आपल्याला वन्य प्राण्यांशी संबंधित असे व्हिडिओ देखील पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांचा थरकाप उडाला आहे.
सध्या या व्हिडिओने सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडिओ बैलांच्या लढाईशी संबंधित आहे. यामध्ये बैलाला रोखण्यासाठी अनेक जण रिंगणात दिसत आहेत. मात्र बेकाबू बैलाने सर्वांचीच अवस्था बिघडवली आहे. त्याची अवस्था खूप बिकट झाली. बैलाचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही.
नेमकं काय घडलं?
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, बैलाला नियंत्रित करण्याचा हा खेळ पाहण्यासाठी अनेक लोक आले आहेत. हा बैल मोकळ्या मैदानात दिसत असून त्याच्या नियंत्रणासाठी अनेकजण रिंगणात आहेत. प्रेक्षक या दृश्याचा आनंद घेत आहेत. दरम्यान, बैलाला खूप राग आलेला असतो. त्याच वेळी त्याच्यासमोर एक तरून येतो. त्यानंतर बैलाने त्या तरूणाला शिंगाने उचलून असे गोल गोल फिरवले की त्याची अवस्था बिकट झाली. ती व्यक्ती उभी राहताच बैल पुन्हा हल्ला करतो. हा क्रम बराच काळ चालू राहितो. शेवटी तो व्यक्ती कसा तरी त्या व्यक्तीचा जीव वाचवून तिथून बाजूल होता. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की, जेव्हा बैल हल्ला करत होता तेव्हा त्याला वाचवण्यासाठी कोणीही आले नाही. बैलाने त्या व्यक्तीला खोलवर जखमा दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रावर parm_raju_pr या अकाऊंटवर अपलोड करण्यात आला आहे. व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांचा व्हिडिओ पाहून थरकाप उडाला आहे. अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका यूजरने म्हटले आहे की, ‘खूप छान, त्याला यमलोक दिसले असेल. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, त्याला किती लागले असेल पुन्हा तो अशी चूक कधीच करणार नाही. तर आणखी एकाने म्हटले आहे की, हे हसण्यासारखे नाही, माणसांनी त्या बैलाला उसकावले असेल.
हे देखील वाचा- Viral Video: दारूच्या नशेत व्यक्तीचा अजब कारनामा; बैलासमोर गेला अन्…, पाहा व्हिडिओ