फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. तुम्ही स्टंटचे, जुगाडाचे तसेच डान्स रिल्सचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. अनेकदा भांडणाचे देखील व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. कधी महिलांच्या, तरुणांच्या-तरुणींच्या भांडाणांचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. अनेकदा ही भांडणे टोकाला पोहचतात की मारामारी सुरू होते.
सध्या असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. यामध्ये एका कारचालकाने असे काही केले आहे की, यामुळे एक डिलीव्हरी बॉयचे नुकसान झाले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. तसेच हा व्हिडिओ पाहून अनेकांनी कार चालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक डिलिव्हरी बॉय रस्त्यावरुन जात आहे. अचानक त्याची बाईक घसरते आणि खाली पडते. त्याच वेळी मागून येणारा कर चालक त्याला धडकतो. कार चालक गाडीतून उतरुन त्या डिलीव्हरी बॉयपाशी येतो आणि अचानक त्याचे सामान रस्त्यावर फेकू लागतो आणि त्याच्या शी भांडू लागतो. त्याच वेळी एक आजोबा तेथे येतात आणि त्या डिलिव्हरी बॉयच्या बाजून बोलतात आणि त्यांचे भांडण मिटवतात. त्यांच्या भांडणाने रस्त्यावर गाड्यांची, लोकांची गर्दी जमा झालेली असते. त्यानंतर तो कारचालक तिथून निघून जात. ते आजोबा त्या डिलिव्हरी बॉयला सामान उचलायला मदत देखील करतात.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ @karan_vishwakarmax या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या संतापजनक प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, काय ही दादागिरी, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, त्या कार चालकाला ठोकले पाहिलजे, अरे काही इज्जत आहे की, नाही. आणखी एका युजरने म्हटले आहे की, कार चालकांनी काही वेगळाच माज असतो. चौथ्या एकाने जे दुसऱ्याला कमी लेखतात त्याचे कधीच आयुष्यात चांगले होत नाही. आणखी एकाने त्या कार चालकाला अद्दल घडवली पाहिजे व्हिडिओ व्हायरल करा अशी प्रतिक्रीया दिली आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, या मोठ्या लोकांपुढे सामान्यांना काहीच इज्ज नसते. त्यांच्या सोबत जेव्हा असे होईल तेव्हाच लक्षात येईल त्यांना
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.