किती गोड! हॉर्नच्या आवाजावर थिरकला चिमुकला ; VIDEO नेटकऱ्यांच्या पसंतीस (फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट)
Viral News Marathi : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र, तर कधी भयावह व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. शिवाय लहान मुलांचे अनेक व्हिडिओ देखील तुम्ही पाहिले असतील. कधी लहान मुलांच्या डान्सचे, तर कधी बोबडी बोलण्याचे, तर कधी मस्करीचे असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. हे व्हिडिओ एकदा पाहिले तरी मन भरत नाही. कधी ही चिमुकले आपलाला आश्चर्यात पाडतात, तर त्यांच्या वागण्याने आपल्याला हसवातात. अनेकदा त्यांच्या प्रश्नांनी आपण अनुत्तरित देखील होतो. सध्या एक भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
लहान मुलांना कधी कोणती गोष्ट आवडेल हे देखील सांगणे कठीण आहे. त्यांच्यासाठी खेळणी आणली तर त्यांना घरातील वस्तूंसोबत खेळायचे असते. पण कधी एखद्या गाडी किंवा त्यांच्या आवडीचे खेळणे घेतले नाही तर रडून रडून त्रास देतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ एका चिमुकल्याला हॉर्नचा आवाज खूप आवडला आहे. हा चिमुकला हॉर्नच्या आवाजावर भन्नाट असा डान्स करत आहे. चिमुकला हॉर्नवर हात वर करुन उड्या मारत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक कार घराच्या बाहेर उभी आहे. येथेच एक चिमुकला आपल्या आईसोबत उभा आहे. कारमध्ये चिमुकल्याचे बाबा बसले आहेत. ते हॉर्न वाजवत आहे. तर इकडे चिमुकला हॉर्न वाजताच हात वर करत डान्स करत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @sarbas_aero_ या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. एका युजरेन “हे फक्त मीच करतोय की लहान मुलांमध्ये हा एकच मूव्ह इन्स्टॉल केलेला आहे.” असे म्हटले आहे. दुसऱ्या एका युजरने छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधत आहे भाऊ असे म्हटले आहे. तर काहींनी कार्टून्सचे नाचणारे गिफ शेअर केले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.