Viral News Marathi : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये इन्फ्लुएन्सर्सचे तर तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असतील. यामध्ये प्रसिद्ध ठिकाणांचे, दृश्यांचे, अन्नाचे, मेकअपचे असे वेगवेगळ्या गोष्टींचे व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या असाच एक अमेरिकन इन्फ्लुएन्सरचा भारताचा व्हिडिओ पाहायला मिळत आहे. यामध्ये तिने लोकांना भारतात जाऊ नका नाहीतर तुमचे आयुष्य पूर्ण बदलून जाईल असेल म्हटले आहे. यामुळे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या अमेरिकन इन्फ्लुएन्सरचे नाव क्रिस्टन फिशर आहे. तिने आपल्याला भारताच्या दौऱ्याबद्दल या व्हिडिओमध्ये अनुभव सांगितला आहे. ती तिच्या कुटुंबासोबत भारतात आली होती. यावेळी तिला भारतात विविध संस्कृती, विविध खाद्यपदार्थ आणि भारतीय पाहुणचाराचा अनुभव मिळाली.
या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने सांगितले आहे की, “भारतात जाऊ नका, तुमचे आयुष्य भारतात गेल्यावर पुन्हा बदलेले. तुम्हा येथे अद्भुत लोक भेटतील, वेगवेळ्या पद्धतीचे अप्रतिम जेवण खायला मिळले, अनेक सौंदर्यपूर्ण आणि नेत्रदीप अशा दृश्य पाहायला मिळतील. भारताच्या समृद्ध संस्कृतीचा आणि इतिहासाचा अनुभव तुम्हाला येथे घेता येईल. एकदा तुम्ही भारतात आल्यावर परत आपल्या मायदेशी जाऊ वाटणार नाही. मी सांगते, माझे हृदय कायमचे भारतात राहिल, तुमच्यासोबतही असेच होईल. भारतातले संदुर आयुष्य तुमचे जीवन बदलून टाकले.”
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. क्रिस्टने हा व्हिडिओ तिच्या इनस्टग्राम अकाउंटवर @kristenfischer3 शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ भारतीयांच्या पसंतीस पडत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी यावर हार्टचे इमोजी शेअर केले आहे. तसेच परदेशी लोकांचे नेमहमीच भारतात स्वागत असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेने भारतात प्रवास करणाऱ्या आपल्या नागरिकांसाठी सल्लागार जारी केला होता. अमेरिकेने नागरिकांना भारतातील वाढत्या गुन्हेगारी आणि लैंगिक घटनांमुळे सावध राहण्याचे आवाहन केले होते. यानंतरच हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.