फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सध्या दिल्ली मेट्रोचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. कधी जोडप्यांचे तर कधी डान्स रील्स. दिल्ली मेट्रो आता मनोरंजनाचा अड्डा बनत चालली आहे. दिल्ली मेट्रोमध्ये पुन्हा एकदा दोन तरुणांमध्ये हाणामारी झाली. यावेळी भांडण सीटवरून झाले नाही तर हेअरस्टाईलवरून तरूणांमध्ये वाद झाला आहे. या तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दिल्ली मेट्रोवरून हाणामारी आणि मारामारीची प्रकरणे रोज समोर येत आहेत. रोज कोणीतरी एकमेकांशी भांडताना दिसतात, कधी सीटसाठी तर कधी आपला स्टेटस दाखवण्यासाठी. नुकताच अशाच एका मुद्द्यावरून दोन तरुणांमध्ये भांडण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओत भांडण करणारे तरुण केस कापण्यावरून एकमेकांशी भिडले आहेत. दोघेही एकमेकांना छपरी म्हणू लागले.
काय घडले?
व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, मेट्रोमध्ये दोन मुले उभी असून ते एकमेकांशी भांडत असल्याचे दिसत आहे. दोघांनीही एकमेकांची मान धरली असून एकमेकांना छपरी म्हणत आहेत. प्रथम एका मुलाने दुसऱ्याला छपरी म्हणून हाक मारली. ज्यावर दुसरा म्हणाला की तुझ्या दिसण्यावरून तू बिबट्यासारखा दिसतोस. तेव्हा त्या मुलाने उत्तर दिले आणि सांगितले की मी केस कापतो त्या ठिकाणाहून तुमच्या सारख्या लोकांना प्रवेश देखील मिळत नाही. तुमच्यासारख्यांना तिथल्या गेटबाहेर फेकले जाते. सगळे एक्स्पर्ट तेथे आहेत. यावर दुसरा म्हणाला – प्रत्येक सलूनमध्ये एक्स्पर्ट नसतो, समजले. हे ऐकून पहिल्या मुलाला राग येतो आणि तो दुसऱ्या मुलाला खेचतो आणि म्हणतो तू बाहेर ये. तेवढ्यात एक सरदारजी आपल्या जागेवरून उठतात आणि त्या मुलाला मेट्रोतून बाहेर उतरावतात.
हे देखील वाचा – चोरी करणे चोरट्यांना महागात पडले; मालकाने केली बेदम मारहाण
व्हायरल व्हिडीओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @Adultsociety नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. ज्याला लाखो लोकांनी पाहिले आणि 50 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिले – मोठ्या शहरांमध्ये छोट्या-छोट्या गोष्टी घडत राहतात. दुसऱ्याने लिहिले – पाजी, त्याने काय वाईल्ड कार्ड एन्ट्री केली आहे. तिसऱ्याने लिहिले – मी त्यांचा नाई आहे, हे लोक माझ्या दुकानात केस कापतात आणि दोघेही खूप मोठे लोक आहेत.