फोटो सौजन्य - Social Media
गुजरात रांझ्यामध्ये पावसाने थैमान घातला आहे. या कोसळधारमुळे वडोदरा येथील विश्वामित्री नदीला पूर आलेला आहे. जोरदार पावसाने गुजरात राज्याचीही तुंबई झाली आहे. पावसाचा परिणाम तेथील जनजीवनावर झालेला दिसून येत आहे. यादरम्यान वडोदरामधील एक व्हिडीओ शोषलं मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हडिओला सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. इंस्टग्राम असो वा फेसबुक, युट्युब असो वा एक्स. सगळीकडे ही व्हिडीओ हवा करत आहेत. या व्हिडिओला लाखोंच्या संख्येत प्रेक्षकांनी पाहिले आहे. एकंदरीत, देशभरात या व्हिडीओचीच चर्चा सुरु आहे. तसेच जगभरातही या व्हिडीओचे पडसाद पाहायला मिळत आहेत. कॉमेंट्समध्ये अगदी जगभरातील नेटकऱ्यांनी प्रतिसाद नोंदवला आहे.
हे वाचून नक्कीच प्रश्न पडला असेल कि,’इतके काय आहे या व्हिडिओमध्ये?, कि व्हिडीओ इतके व्हायरल होत आहे.’ तर त्याला कारणही तसेच आहे. आजपर्यंत आपण कुत्रे तसेच मांजरींना बाईक- स्कुटीची सफर करताना पाहिली असेल. परंतु, व्हायरल व्हिडिओमध्ये चक्क प्राणघातक प्राणी मगर स्कुटरची सफारी करत आहे. एका पट्ठ्याने या मगरीला कुशीत घेतले आहे आणि पुढचा पट्ठ्या स्कुटर चालवत आहे. रस्त्यावरील साऱ्यांची नजर त्यांच्यावर आहे. मगरीला लांबूनच पाहिले तरी व्यक्ती लांब पाळून जातो. परंतु, या पट्ठ्यांच्या कामगिरीने नेटकरी हैराण झाले आहेत.
Two young men took a crocodile found in Vishwamitra river in Vadodara to the forest department office on a scooter🫡
pic.twitter.com/IHp80V9ivP— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) September 1, 2024
सदर व्हिडीओ गुजरात राज्यातील असून वडोदरामध्ये झालेल्या अतिवृष्टीचा परिणाम आहे. वडोदरा विभागाचे वन अधिकारी करण सिंह राजपूत म्हणतात कि,”विश्वामित्री नदीमध्ये तब्बल ४४० मगरी वास्तव्यास आहेत. दरम्यान अजवा धरणाचे दरवाजे खुले करण्यात आल्यामुळे पुराच्या परिस्थितीत त्यातील काही मगरी मानवी क्षेत्रात वाहून आल्या. त्यातील अनेक मगरी तसेच साप, कासव अशा अनेक प्राण्यांना रेस्क्यू केले गेले आहे.” ते म्हणतात कि या पुरामध्ये वाहून आलेल्या मगरींमध्ये एक १४ फुटी लांब मगरीला रेस्क्यू केले गेले होते. जी तेथील मोठ्या लांबीच्या मगरींपैकी एक आहे.
हे देखील वाचा : ‘मेरा जुता है जपानी’ गाण्यावर आजीचा भन्नाट डान्स; व्हिडीओ तुफान व्हायरल
सदर व्हायरल व्हिडिओमध्ये ते दोन युवक त्या मगरीला रेस्क्यू करून घेऊन जात आहेत. दरम्यान या व्हिडीओखाली अनेक नेटकऱ्यांनी त्यांचा प्रतिसाद नोंदवला आहे. एक नेटकरी म्हणतोय कि,” असं वाटत आहे कि मगर त्या सफरीची मज्जा घेत आहे.” तर सूर्य नेटकाऱ्याने लिहले आहे कि,” त्या दोन युवकांना खतरो के खिलाडी म्हणून पुरस्कार जाहीर करा.”