मुलाच्या जीवाशी खेळ! फोटोसाठी चिमुकल्याला सिंहावर बसवण्याचा हट्टीपणा वडिलांना नडला ; नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Viral News marathi : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. अलीकडे सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक अजीबो-गरीब स्टंट करतात. तसेच अनेक धोकादायक स्टंटही करतात. एका लाईक्स आणि व्ह्यूजसाठी लोक आपला, आपल्या लोकांचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालतात. कोणताही मागचा पुढचा विचार न करता स्टंट करतात. अनेकदा याचे लोकांना गंभीर परिणाम भोगावे लागतात. मात्र तरीही तीच चुक पुन्हा पुन्हा करतात. अलीकडे लहान मुलांना देखील असे धोकादायक गोष्टी करायला भाग पाडले जाते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. एक वडिलांनी चिमुकल्याचा जीव धोक्यात घातला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माणूस सिंहाच्या पिंजऱ्यात उभा राहिलेला दिसत आहे. त्याच्या हातात एक चिमुकला आहे. तो व्यक्ती चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु चिमुकला अतिशय घाबरलेला दिसत आहे. व्यक्ती चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवण्याचा प्रयत्न करत आहे. चिमुकलाल रडत असूनही तो दोन-तीन वेळा असा प्रयत्न करतो. याच वेळी अचानक सिंह मागे वळून पाहतो. यामुळे चिमुकला जास्त घाबरतो. याच वेळी हे दृश्य पाहणारे लोक त्या चिमुकल्यावर हसत आहेत. व्हिडिओमध्ये लोकांच्या हसण्याचा आवाज येत आहे. तसेच दृश्यावरुन लक्षात येते की हा व्हिडिओ एखाद्या प्राणीसंग्रहालयातील आहे. परंतु नेमका कुठला आणि कोणत्या प्राणी संग्रहालयातील आहे याबाबत माहिती मिळालेली नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @badparentingtv या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. एका युजरने, लोक अशी हिंमत करुच कसे शकता असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने याला अटक करण्यात आली पाहिजे असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोकांनी चिमुकल्याचा जीव धोक्यात घालणाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.