(फोटो सौजन्य: X)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये ख्वाजा आसिफ सियालकोट कॅन्टोन्मेंटमध्ये पिझ्झा हट-ब्रँडेड आउटलेटचे उद्घाटन करताना दिसत आहेत. फुलांची सजावट, रिबन कापणे आणि कॅमेऱ्यांसमोर मंत्र्यांचे हसणे हे सर्व जण एखाद्या अधिकृत समारंभासारखे वाटत होते. पण हा समारंभ फार काळ टिकू शकला नाही. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, पिझ्झा हट पाकिस्तानने एक सार्वजनिक निवेदन जारी करून हे आउटलेट पूर्णपणे अनधिकृत आणि फसवे असल्याचे स्पष्ट केले. कंपनीने म्हटले आहे की सियालकोट कॅन्टोन्मेंटमध्ये असलेले हे आउटलेट कोणत्याही प्रकारे पिझ्झा हट पाकिस्तान किंवा Yum! ब्रँडशी संलग्न नाही. पिझ्झा हटने असेही स्पष्ट केले की रेस्टॉरंट त्यांच्या पाककृतींचे पालन करत नाही, त्यांची गुणवत्ता, अन्न सुरक्षा किंवा ऑपरेशनल मानकांचे पालन करत नाही. ट्रेडमार्कचा गैरवापर रोखण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे असे कंपनीने म्हटले आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, पिझ्झा हट पाकिस्तानने एक सार्वजनिक निवेदन जारी करून हे आउटलेट पूर्णपणे अनधिकृत आणि फसवे असल्याचे स्पष्ट केले. कंपनीने म्हटले आहे की सियालकोट कॅन्टोन्मेंटमध्ये असलेले हे आउटलेट कोणत्याही प्रकारे पिझ्झा हट पाकिस्तान किंवा यम! ब्रँडशी संलग्न नाही. पिझ्झा हटने असेही स्पष्ट केले की रेस्टॉरंट त्यांच्या रेसिपीजचे पालन करत नाही, त्यांची काॅलिची, फूड सिक्योरिटी किंवा ऑपरेशनल मानकांचे पालन करत नाही. ट्रेडमार्कचा गैरवापर रोखण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे असे कंपनीने म्हटले आहे.
Khawaja Asif, the so-called Defence Minister, ends up inaugurating a fake Pizza Hut franchise in Sialkot. Pizza Hut issued a statement calling the franchise a fraud. These are the dumb boomers imposed on us. pic.twitter.com/Q77qLX3ekE — MD Umair Khan (@MDUmairKh) January 20, 2026
मंत्र्यांनी हजेरी लावलेले दुकान बनावटी निघाले हे पाहून सोशल मिडियावर पुन्हा एकदा पाकिस्तानच्या नावाने मीम्सचा पूर आला. यूजर्सने पाकिस्तानची खिल्ली उडवत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एका युजरने लिहिले आहे, “नशीबच खराब आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “दररोज होणारे दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट आणि बलात्कार, चाकूहल्ला आणि गळा चिरण्यासारख्या इतर नियमित कारवायांच्या तणावपूर्ण वातावरणात, किमान माननीय संरक्षणमंत्र्यांनी काही आवश्यक विनोदी मनोरंजन तरी दिले आहे. हाच पाकिस्तान आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “राष्ट्रीय सुरक्षेपासून ते पिझ्झा सुरक्षेपर्यंत, व्हेरिफिकेशन गरजेचं आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






