छावा चित्रपटातील 'तो' हृदयद्रावक सीन; अन् रागात प्रेक्षकाने थेट केलं असं काही... बघून व्हाल थक्क, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सध्या विकी कौशलचा छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘छावा’ चित्रपटाची चर्चा जोरदार सुरु आहे. 14 फेब्रुवारीला रिलीज झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे. चित्रपटातील डायलॉग, सीन्स लोकांच्या अंगावर शहार आणत आहे. अनेकजणांना हा चित्रपट पाहिल्यानंतर भरुन आले आहे. तसेच विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली असून चाहत्यांकडून प्रचंड कौतुक होत आहे.
सगळे थिएटर्स हाऊसफुल झाले असून प्रत्येक वयोगटातील व्यक्तींच्या मनावर हा चित्रपट राज्य करत आहे. अनेकांच्या डोळ्यात छत्रपती संभाजी राजांचे बलिदान पाहून डोळे पाणवले आहेत. दरम्यान या चित्रपटासंबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ गुजरातमधील थिएटरचा असल्याचे म्हटले जात आहे. गुजरातमध्ये चित्रपटत पाहातानि थिएटरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.
एका तरुणाने चालू शो दरम्यान चित्रपटगृहाचा पडदा फाडण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना रविवारी घडली असून सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. या घटनेनंतर संपूर्ण सिनेमागृहात मोठा गोंधळ उडाला होता. या प्रेक्षकाला गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जेव्हा छावा चित्रपटात औरंगजेब छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करतानाचे दृश्य सुरु होते यादरम्यान ही घटना घडली, तरुणाला आपल्या भावना अनावर झाल्या आण त्याने थेट स्क्रिन फाडाया सुरुवात केली. यामुळे चित्रपटगृहाचे मोठे नुकसान झाले असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाचा शएवटचा सीन चालू असताना तरुणाने राग आल्याने पडद्याजवळ जाऊन फाडायला सुरुवात केली. त्यानंतर चित्रपटगृहाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. सध्या या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. याशिवाय असेच अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. अनेकांना हा चित्रपट पाहून अश्रू अनावर झाले आहेत. एका लहान मुलाचा रडताना व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.