अति घाई संकटात नेई! धावती ट्रेन पकडणं तरुणाच्या अंगलट; पाय घसरला अन्...; Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर तुम्ही अनेक अपघातांचे व्हिडिओ पाहिले असतील. कधी रेल्वे अपघात, तर कधी बस अपघात असे अनेक धक्कादायक असे व्हिडिओ आपल्याला पाहयला मिळतात. गेल्या काही काळात अनेक रेल्वे अपघातांच्या घटना देखील घडल्या आहे. अनेकदा हे अपघात नैसर्गिक असतात, तर काही वेळा लोकांच्या निष्काळजीपणामुळे अपघातात होतात. सध्या असाच एक मुंबईतील एक रेल्वे अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओत एक तरुण धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना त्याचासोबत दुर्घटना घडली आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ मुंबईच्या अंधेरी रेल्वे स्टेशनवरील आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, प्लॅटफॉर्मवरुन एक ट्रेन सुटली असून वेग पकडत आहे. याचदरम्यान एक तरुण तिथे येतो. बहुतेक त्याला उशिर झाला आहे. कारण तो धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतो. याचवेळी त्याचा पाय घसरतो आणि तो ट्रेन खाली पडतो. दरम्यान तो पडणार इतक्यात तिथे ड्युटीवर असलेले पोलिस निरिक्षक त्याला पकडतात आणि त्याला बाहेर काढतात. त्यांच्या तत्परतेमुळे तरुणाचा जीव वाचतो. याचवेळी एक महिला पोलिस कर्मचारी आणि काही लोक त्या तरुणापाशी येतात. हा व्हिडिओ इतका धक्कादायक आहे की पाहून अंगावर काटा येईल.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
*मौत से मुंह से यात्री को बचाया!*
मुंबई रेलवे के एक सहायक उपनिरीक्षक की तत्परता के चलते रविवार को अंधेरी रेलवे स्टेशन के प्लेटफार्म नंबर 8 पर लोक शक्ति एक्सप्रेस और प्लेटफार्म के बीच गिरे हुए एक यात्री को बचा लिया गया |
मुंबई रेलवे के सहायक उप निरीक्षक पहुप सिंह अंधेरी… pic.twitter.com/UkQwL5Qart
— Jayprrakash Singh (@jayprakashindia) February 16, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @jayprakashindia या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये घटनेची माहिती देण्यात आली आहे. दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या अंधेरी रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर 8 वर लोक शक्ती एक्सप्रेसमध्ये चढताना तरुणासोबत दुर्घटना घडली, मात्र पोलिस कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे त्याचे प्राण वाचले. या प्रवाशाला अहमदाबादला जायचे होते पण त्याला उशिर झाला. त्याची ट्रेन सुटली होती.
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत असून अनेकांनी अति घाई संकटात नेई असे म्हटले आहे. तसेच यापूर्वी देखील अशा अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, तरीही लोक निष्काळजीपणे वागतात. प्रशासनाने देखील अनेकदा सुचना दिल्या आहेत तरीही लोकांना स्वत:च्या जीवाची परवा नाही.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.