नादच केला पठ्ठ्यानं! विराट कोहलीचा गेटअप करुन मॉलमध्ये घुसला; सेल्फी घेण्यासाठी सुरक्षा कर्मीसह शेकडोंची धावपळ, VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊमधील एका मॉलमध्ये ही घटना घडली आहे. कार्तिक शर्मा नावाच्या कंटेट क्रिएटरने विराट कोहलीचा गेटअप केला आणि मॉलमध्ये घुसला आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, पठ्ठ्याने RCB ची जर्सी घातली आहे. विराट कोहलीसारखी दाढी केली आहे. तसेच कॅप आणि गॉगल घालून कारमधून मॉलच्या बाहेर आला. त्याच्यासोबत काही त्याचे मित्र त्याचे फॅन बनण्याची अॅक्टिंग करत आहेत.
एवढेच नव्हे तर त्याच्यासोबत चार धिप्पाड बाऊन्सर्स आणि मॅनेजरची टिम देखील आहे. कार्तिक अगदी हुबेहूब विरोटच्या स्टाइलमध्ये चालत मॉलमध्ये घुसला आहे. त्याचा स्वॅग पाहून लोकांनी त्याला विराट कोहली समजले आणि बघता बघता मॉलमध्ये विराट-विराटचा जल्लोष उडाला. मॉलच्या सुरक्षा कर्मचाऱ्यासह सर्व लोक सेल्फीसाठी त्याच्या मागे धावत आहे. कार्तिक संपूर्ण मॉलमधून एक चक्कर मारत असून त्याच्या मागे लोकांची गर्दी पाहला मिळत आहे.
🔥👑 Virat Kohli’s aura is so powerful that even the fake Virat Kohli couldn’t help but notice it. That’s the mark of true greatness. ✨⚡#ViratKohli #Aura #KingKohli pic.twitter.com/obIEwBj82T — CricFeverNow (@VIRATIAN_F) July 7, 2026
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. भावाने लय मोठा गेम केला, संपूर्ण मॉलला एप्रिल फूल बनवलं असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने विराट कोहलीची क्रेझ काय आहे हे यावरुन स्पष्ट होते असे म्हटले आहे. तर काही लोकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. अशा प्रकारच्या प्रँकमुळे चेंगराचेंगरी झाली असती असे म्हटले आहे. तसेच सिक्युरिटी गार्डने ड्युटी सोडणेही चुकीचे असल्याचे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुफान वेगाने व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






