फोटो सौजन्य: सोशल मीडिया
अलीकडे सोशल मीडियामुळे सतत काही ना काही वेगळे पाहायला मिळते. कपल डान्स तर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच वेगवेगळ्या गाण्यांवर रील्स बनवून सोशल मीडियावर पोस्ट करतात. यात आता वृद्ध लोकांचाही समावेश होतोय. बऱ्याचदा असे व्हिडीओ पाहून विश्वास बसत नाही. पण असे व्हिडीओ व्हायरल देखील होतात.
सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आजी-आजोबांनी अनोख्या अंदाजमध्ये केलेला डान्स व्हिडीओ आहे. जो पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच त्यांच्या प्रमात पडाल. आजी-आजोबांनी एका बॉलीवूड गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
आजी-आजोबांचा धमाल डान्स
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की आजी आजोबा एका बॉलीवूड गाण्यावर डान्स करत आहे. अमीर खान व अजय देवगणच्या इश्क चित्रपटाचील हमके तुमसे प्यार है..या भन्नाट गाण्यावर धमाल डान्स केला आहे. आजोबा गाण्यातून मस्त ॲक्शन करत आजीला आपल्या प्रेमाची कबुली देत आहेत. आजी पण आजोबांनी बोलवल्यावर डान्स करत आजोबांपाशी जाते. आजी-आजोबांचा हा धमाल डान्स प्रचंड व्हायरल होत आहे.
हे देखील वाचा- अरेच्चा! सायकल चालवणारी गाय; व्हिडिओ पाहिल्यानंतर वाटेल आश्चर्य
व्हायरल व्हिडीओ
नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
या व्हिडीओला आत्तापर्यत हजारो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. हा व्हिडीओ error69 /e अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना म्हटले आहे की, ‘माझा मित्र लग्नानंतर त्याच्या बायकोसाबत असा डान्स करणार.’ या व्हिडीओवर एकाने कमेंट केली आहे की, मला वाटते आजी-आजोबांनी डॉक्टरांकडून 17 वर्षाची लस घेतली आहे, तर आणखी एकाने लिहिले आहे की, भाऊ, या वयातही एवढा जोष, मस्तच. दुसऱ्या एकाने लिहिले आहे की, आजी-आजोबांनी छान डान्स केला आहे. हा व्हिडीओ अनेकांनी रिपोस्ट देखील केला आहे.