फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. असे काही व्हिडिओ आहेत जे पाहिल्यानंतर ते खरे की खोटे यावर विश्वास ठेवणे कठीण होते.तुम्ही आत्तापर्यंत माणसांना सायकल चालवताना पाहिले असेल. सोशल मीडियावर सायकल स्वाकांचे व्हिडीओ देखील व्हायरल होतात. अनेक हेल्थ कॉन्शियस लोक रोज सायकल चालवतात. तसेच सायकल तुम्ही सर्कसमद्ये देखील सायकल चालवणारे प्राणीही पाहिले असतील.
पण तुम्ही कधी गायीला सायकल चालवताना पाहिलं आहे का? तुम्ही लोक म्हणत असाल- अरे, असंही कुठे होतं का? पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक गाय सायकल चालवत आहे. हा व्हिडीओ ज्याने पाहिला तो आश्चर्यचकित झाला आहे. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया युजर्सना तो खरा की खोटा यावर विश्वास बसत नाहीये.
हे देखील वाचा- रिक्षा चालकाला इंग्रजी बोलताना पाहून परदेशी पण चकीत; लोक म्हणाले…
व्हायरल व्हिडीओ
व्हायरल होत असलेले व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक गाय सायकल चालवताना दिसत आहे. गाईचे पुढचे दोन्ही पाय सायकलच्या पॅडलवर आणि दोन मागच्या बाजूला असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. गाईचे पायही पेडलसोबत फिरत आहेत. गाय सायकलच्या हँडलच्या मध्यभागी डोके ठेवलेले आहे. मात्र, हा व्हिडिओ खरा आहे की खोटा, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. हे एआयच्या माध्यमातून एडिट करून तयार करण्यात आले आहे. लोक म्हणतात की, कोणतीही गाय अशी सायकल चालवू शकत नाही.
हा व्हिडिओ 7 कोटींहून अधिक लोकांनी पाहिला आहे तर हजारो लोकांनी कमेंट केल्या आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ हसास हॅबरलर नावाच्या युजरने एक्सवर शेअर केला आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. आत्तापर्यंत 45.7 हजार लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. हा व्हिडिओ लोकांच्या मनोरंजनाचे केंद्र बनला आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, ‘मला खोटे वाटत आहे, असे कधी होते का?’ अजुन एका यूजरने लिहिले की, ‘आता गायीचे काम फक्त दूध देणे राहिलेले नाही तर आता तिला दूध देण्यासाठी घरोघरी जावे लागेल.’ आणखी एकाने लिहिले की, ‘व्हिडिओ बनवणाऱ्याने चांगला प्रयत्न केला आहे परंतु हे स्पष्ट झाले आहे की व्हिडिओ बनावट आहे.’‘मला असे वाटले की मी दारू प्यायली आहे आणि मी शुद्धीत नाही.’ असेही एकाने म्हटले आहे.