रेस्क्यू करायला गेलेल्या कर्मचाऱ्यांना झाली पळता भूई थोडी...! हत्तीणीचा रुद्रावतार पाहून व्हाल तुम्हीही थक्क (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. अलीकडे प्राण्यांसबंधित असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. कुठे प्राण्यांची झुंज पाहायला मिळत आहे, तर कुठे प्राण्यांचे शिकार करतानाचे व्हिडिओ पाहायला मिळत आहेत. सध्या कर्नाटकाच्या जंगलातील असाच एक हत्तीणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक हत्तीणी दोन माणसांचा पाठलाग करताना दिसत आहे. तर कर्मचारी जीव वाचवण्यासाठी जीवाच्या अकांताने पळत आहेत.
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकाच्या हसन जिल्ह्यातील अरेहल्ली गावाजवळच्या जगंतील हा व्हिडिओ असल्याचे म्हटले आहे. यामध्ये वन विभागाचे दोन कर्मचारी पुरुष एका हत्तीणीच्या रेस्क्यूसाठी गेले होते. मात्र हत्तीणीने त्यांच्यावर हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, एक हत्ती जंगलातून भटकून गावाच्या शेतात पोहोचला होता. यावेळी गावकऱ्यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही माहिती दिली. दरम्यान कर्मचारी हत्तीणीला जंगलात पाठवम्याचा प्रयत्न करत होते. मात्र याच ठिकाणी असलेल्या दुसऱ्या एका हत्तीणीने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. दोन्ही कर्मचाऱ्यांनी कसा तरी तिथून पळ काढला. मात्र, या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
Emergency Task Force (ETF) personnel of Karnataka Forest Department were attempting to drive back an elephant to forests when another tusker suddenly charged on them. They could manage to escape. Human-Elephant conflict is a challenging task for our field officials. pic.twitter.com/CF69Q3j5rh
— Ramesh Pandey (@rameshpandeyifs) March 19, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
हा व्हिडिओ भारतीय वनसेवा विभागाचे अधिकारी @rameshpandeyifs यांनी एक्सवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी प्रकणाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले आहे की, हत्तीणीला जंगलात पाठवण्याचे काम अधिकाऱ्यांसाठी आव्हानात्मक होते. त्यांनी ते पूर्ण केले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, वनरक्षकांचे काम धोकादायक आहे, तर दुसऱ्या एकाने म्हटले आहे की, आपण प्राण्यांचे अन्न, निवार सर्वच हिरावून घेतले आहे. तसेच काहींनी प्राणी सहसा हल्ला करत नाहीत, कर्मचाऱ्यांनीच काहीतरी खोड काढली असणार असे म्हटले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.