Viral Video: सरांचा शिकवण्याचा पॅटर्न सोशल मीडियावर चर्चेत; पावडर घेतली, तोंडाला लावली अन्...; तुम्हीच पाहा पुढे काय घडलं?( फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. स्टंट, जुगाड, भांडण, डान्स रिल्स सतत काही ना काही व्हायरल होत असते. अलीकडे शिक्षकांचे मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने शिकवण्याचे देखील व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ प्रचंड नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला असून एका शिक्षकांनी मुलांना एका वेगळ्याच पद्धतीने बचतीचे धडे दिले आहेत.
असे म्हणतात आई-वडिलांनतर शिक्षक हा विद्यार्थ्याच्या जीवनाचा शिल्पकार असतो. विद्यार्थ्याच्या आयुष्याच्या जडणघडणीत त्याची महत्त्वाची भूमिका असते. शिक्षक फक्त शालेय गोष्टींचे नाही तर जीवनाचे देखील धडे देत असतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एका शिक्षकाचा वेगळाच पॅटर्न दिसून आला आहे. या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडिओ कुठल्या शाळेचा आहे याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.
नेमकं काय केले शिक्षकाने?
व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक मराठी शाळेतील शिक्षक मुलांना पावडर कशी लावावी आणि कशी लावू नये याचे प्रात्यक्षिक करून दाखवत आहेत. हातात पावडर घेऊन, ती चेहऱ्यावर योग्य पद्धतीने लावल्यास किती कमी पावडर लागते आणि त्याचप्रमाणे वाया न घालवता बचत कशी करता येते हे शिक्षकांनी दाखवले. त्यांनी आपल्या शिकवणीतून जीवनातील छोटीशी सवयही कशी महत्त्वाची असते, हे मुलांना समजावून सांगितले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @tanajidhumal333 या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला “बचतीचे शिक्षण” असे कॅप्शन देण्यात आले आहे. व्हिडीओला अल्पावधीतच प्रचंड प्रसिद्धी मिळाली असून, 1.9 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज आणि असंख्य कमेंट्स मिळाल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, आता कळलं मुलांचा सिलॅबस का संपत नाहीये, तर दुसऱ्या एका युजरने “ही मुलं खूप भाग्यवान आहेत” असे म्हटले आहे. एकाने प्रश्न विचारला आहे की, “पावडरच का लावायची आहे?” तरअनेकांनी शिक्षकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. असे शिक्षण शालेय जीवनात देणे महत्त्वाचे असल्याचे लोकांनी म्हटले आहे. या व्हिडिओला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.