PaK-Afghan War : मध्यपूर्वेत आग लागली असताना दक्षिण आशियातही युद्ध सुरुच; तालिबानचा थेट पाक सीमेत घुसून वार (फोटो सौजन्य: एआय जनरेटेड)
अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने एक निवनेदन जारी करत दावा केला आहे की, त्यांच्या सैन्याने पाकिस्तानी सैन्याच्या कुरापतींना प्रत्युत्तर दिले आहे. कांधार प्रदेशातील स्पिन बोल्डक आणि शोराबक जिल्ह्यांतील ३, तर खोस्तमधील अली-शेर येथील २ चौक्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. तसेच यावेळी पाकिस्तानी पोलिस आणि तालिबानी लढवय्यांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत पाकिस्तानचे तीन सैनिक ठार झाले आहेत. तसेच तालिबानने एका सैनिकाला जिवंत पकडल्याचा दावा केला आहे.
तालिबानने इशारा दिला आहे की, हा हल्ला केवळ लष्करी कारवाई नव्हे तर पाकिस्तानी सैन्याकडून खैबर पख्तूनख्वा आणि बलोच नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाचा बदला आहे. तालिबानचे गुप्तचर अधिकारी जबर नोमानी यांनी खैबर पख्तूनख्वा आणि बलोच नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
याशिवाय या कारवाईच्या एक दिवस आधीच तालिबानने रावळपिंडीतील नूर खान हवाई तळावर आणि क्वेट्टामधील १२ व्या कॉर्प्सच्या मुख्यालयावर यशस्वी हवाई हल्ला केला होता. तालिबानच्या मते, पाकिस्तानी विमानांनी काबूल आणि बग्राममधील त्यांच्या तळांवर केलेल्या घुसखोरीचा हा सूड आहे. या हल्ल्यात खैबर पख्तूनख्वामधील घेलानी लष्करी तळाचेही मोठे नुकसान झाले आहे. रावळपिंडीसारखा सुरक्षित भागही आता तालिबानच्या टप्प्यात आल्याने पाकिस्तानी लष्कराची झोप उडाली आहे.
पाकिस्तान अफगाणिस्तान वाद (Pak-Afghan Conflict) काही नवीन नाही. दोन्ही देशांमध्ये यापूर्वी देखील सीमेवर गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. या वादाचे मुख्य कारण म्हणजे १३२ वर्षे जुनी ड्युरंड सीमारेषा आहे. अफगाणिस्तान या सीमेला अधिकृतपणे स्वीकारण्यास तयार नाही. यामुळे या सीमेवरुन सतत वाद होत असतो. सध्या या वादाचे भयंकर युद्धात रुपांतर झाले आहे.
Ans: पाकिस्तान अफगाणिस्तान वाद १३२ वर्षे जुना असूून डूरंड रेषेवरुन सुरु आहे. अफगाणिस्तान या सीमेला अधिकृतपणे स्वीकारण्यास तयार नाही. यामुळे या सीमेवरुन सतत वाद होत असतो. सध्या या वादाचे भयंकर युद्धात रुपांतर झाले आहे.
Ans: पाकिस्तानच्या कांधार प्रदेशातील स्पिन बोल्डक आणि शोराबक जिल्ह्यांतील ३, तर खोस्तमधील अली-शेर येथील २ चौक्या तालिबानने ताब्यात घेतल्या आहेत.






