VIRAL VIDEO : "आजकाल तुम्ही सगळे ट्विटरवर....", मोदींची मॅक्रोन यांना कानपिचकी; इमॅन्युएल यांनीही हसून दिली दाद (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मंगळवारी कॅनडामध्ये झालेल्या G7 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींनी देखील सहभाग घेतला होता. भारत हा या परिषदेचा सदस्य नाही, परंतु कॅनडाचे पंतप्रधाने इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींना आमंत्रण दिले होते. त्यांच्या आमंत्रणावरुन G7 परिषदेसाठी पंतप्रधान मोदींनी उपस्थित दर्शवली. यावेळी त्यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची देखील भेट घेतला. यावेळी दोन्ही एकमेकांना मिठी मारली आणि विनोदही केला.
दरम्यान या दृश्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. यामध्ये पंतप्रधानांनी एक हलकी-फुलकी टीका केली आहे. या मॅक्रॉन खळखळून हसले असून सध्या याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यानंतर इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या देखील हस्तांदोलन केले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मोदींनी असे काय म्हटले की, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष हसू आले.
तर पंतप्रधान मोदींना मॅक्रॉन यांनी भेटल्यावर तुम्ही कधी आलात? असा प्रश्न केला. यावर उत्तर देताना मोदींनी मी रात्री पोहोचलो आणि काल सायप्रसला भेट दिली असे म्हटले. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी एकमेकांना मिठी मारली. यावेळी पंतप्रधान मोदींनी, Nowday’s you are fightng on twitter’ म्हणजेच अलीकडे तुम्ही सोशल ट्विटरवर भांडत आहात असे म्हटले. यावर इमॅन्यएल मॅक्रॉन खळखळून हसले. खरंतर पंतप्रधान मोदींनी ही टीप्पणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांच्यातील ट्विटरवर झालेल्या वादविवादवर केली होती.
Modi to Macron “Nowadays you’re fighting on twitter” referring to Macron & Trump. Both men then share a hearty chuckle. Modi clearly has a very good sense of humour. pic.twitter.com/We3wqpPS5S
— Abhijit Iyer-Mitra (@Iyervval) June 18, 2025
काही आठवड्यांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्यात वाद सुरु होता. ट्रम्प यांच्या बिग वन ब्युटीफुल या विधेयकावरुन हा वाद सुरु झाला होता. जवळपास दोन आठवडे दोघेही सोशल मीडियावर एकमेकांवक टीप्पणी करत होते. काही दिवसानंतर मस्क यांनी माघार घेत डोनाल्ड ट्रम्प यांची मफी मागितली. ट्रम्प यांनी त्यांना माफ तर केलं, परंतु दोघांमधील संबंध पूर्वीसारखे होतील की नाही यावर शंका व्यक्त केली जात आहे.
सध्या पंतप्रधान मोदी आणि इॅमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यातील या विनोदाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.