निर्दयी कृत्य! सासरच्या छळाला कंटाळून महिलेने छतावरुन मारली उडी...; पुढं नवऱ्याने जे केलं धक्कादायक, Video Viral (फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट)
सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका महिलेन दोन मजली इमारतीच्या छतावरुन उडी मारली आहे, पण त्यानंतर तिच्यासोबत जे घडलं जे धक्कादायक आहे. उत्तर प्रदेशाच्या अलीगढमध्ये ही घटन घडली आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, एक महिलेला हुड्यांसाठी मारहाण करण्यात आली होती. यामुळे महिलेने थेट टोकाचे पाऊल उचलले. तिने घराच्या छतावरुन उडी मारली. महिला खाली कोसळल्यावर तिला रुग्णालयात नेण्या ऐवजी तिच्या सासरच्या लोकांना आणि नवऱ्याने मारायला सुरुवात केली.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला दोन मजली घराच्या छतावर उभी असल्याचे दिसत आहे. येथेच खाली काही लोक याचा व्हिडिओ बनवत आहेत. महिला अचानक छतावरुन खाली उडी मारते. यामुळे ती पोटावर खाली पडते. यानंतर आसापस गोंधळ उडतो, मात्र तिला रुग्णालयात नेण्याऐवज तिला मारायला लागताता. या भयानक घटनेचा व्हिडिओपाहून तुम्हालाही राग अनावर होईल. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ
यूपी के अलीगढ़ में एक महिला को उसके पति और ससुराल वालों ने दहेज के लिए इतना परेशान किया कि वह मजबूर होकर पहली मंज़िल से कूद गई। ज़मीन पर मुँह के बल गिरी, गंभीर रूप से घायल हुई, फिर भी बच्चों के सामने उसकी बेरहमी से पिटाई की गई..💔
यही है हमारा समाज जहाँ एलिमनी पर बवाल मचता है,… pic.twitter.com/TXgFtjElm4
— Zoya khan (@Zoyakhan7025) September 3, 2025
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओने सोशल मीडियावर संतापाची लहर आली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Zoyakhan7025 या अकाउंटवर शेअर करुन घटनेची माहिती देण्यात आली आहे. अनेकांनी यावर संताप व्यक्त करत महिलेच्या सारसरच्यांवर कारवाईची मागणी केली आहे. तुम्ही पाहू शकता की महिलेला लाथा-बुक्क्यांनी हाणले जात आहेत. गेल्या काही काळात हुड्यांसाठी महिलांचा बळी गेल्याच्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. या घटनेने देखील पुन्हा एकदा हुंड्यांसारख्या कुप्रथांवर प्रश्न उभे राहिले आहेत. आजही यामुळे अनेक महिलांना त्रास सहन करावा लागत आहे असे लोकांनी म्हटले आहे.
माणुसकी गेली कुठे? पावसामुळे ऑर्डर उशिरा मिळाल्याने डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण, VIDEO VIRAL
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.