पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यामध्ये युद्ध (Israel Hamas War) सुरू होऊन जवळपास महिना उलटला आहे. हे युद्ध कधी संपेल हे कोणालाच माहीत नाही. मात्र, दिवसेंदिवस या युद्धाची तीव्रता वाढताना दिसत आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत 11,000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आता, शनिवारी इस्रायली लष्कराने गाझा येथील निर्वासितांच्या छावणीवर हल्ला केला असून त्यात 30 जण ठार झाले आहेत.
[read_also content=”‘भगवान श्रीकृष्णाची इच्छा असेल तर मी लोकसभा निवडणूक लढवणार’, कंगना रणौतनं राजकारणात येण्याचे दिले संकेत! https://www.navarashtra.com/movies/kangana-ranaut-hinted-to-join-politics-by-contesting-the-lok-sabha-elections-nrps-477818.html”]
गाझाच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते अश्रफ अल-कुद्रा यांनी सांगितले की, अल-अक्सा शहीद रुग्णालयात आणखी 30 मृतदेह आणण्यात आले आहेत. मध्य गाझा पट्टीजवळील अल मगजी कॅम्पवर हा हल्ला करण्यात आला. त्याचबरोबर हमासने टेलिग्रामवर असेही म्हटले आहे की, इस्रायल सामान्य लोकांच्या घरांना लक्ष्य करत आहे. याशिवाय मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये बहुतांश मुले आणि महिलांचा समावेश आहे. एका ३७ वर्षीय पत्रकाराने सांगितले, माझे घर कॅम्पजवळ होते. हवाई हल्ल्यानंतर माझे घरही कोसळले आहे.
इस्त्रायली हल्ल्यात दोन मुलगे, एक 13 वर्षांचा आणि एक 4 वर्षांचा, ठार झाला, असे दुसर्याने एएफपीला सांगितले. याशिवाय त्याचा भाऊ, भावाची पत्नी आणि इतर दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत. इस्त्रायली लष्कराच्या प्रवक्त्याचे म्हणणे आहे की, इस्रायली सैन्य त्या भागात गेले होते की नाही हे पाहिले जात आहे. इस्रायलचे म्हणणे आहे की गाझातील दहशतवादी संघटनाही कधी कधी चुकून किंवा जाणूनबुजून त्यांच्या नागरिकांना लक्ष्य करतात.