चीनकडून भारताला खास आमंत्रण; पंतप्रधान मोदी हेवे-दावे विसरुन करणार का दोस्ती? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अमेरिकेच्या (America) वाढत्या दबावादरम्यान पंतप्रधान मोदींचा हा दौरा महत्वाचा ठरू शकतो असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. चीन आणि भारत दोन्ही देश सध्या अमेरिकेच्या टॅरिफला तोंड देत आहे. पंतप्रधान मोदींचा चीनला हा दौरा ७ वर्षानंतर होत आहे. यापू्र्वी २०१८ मध्ये पंतप्रधान मोदी किंगदाओ येथे झालेल्या SCO परिषदेत सहभागी झाले होते.
डोनाल्ड ट्रम्प यांचं पितळ पडलं उघडं; रशियाशी व्यापारावर प्रश्न विचारताच उडाला चेहऱ्याचा रंग
अद्याप भारताकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मोदींचा हा दौरा अशा वेळी होत आहे, जेव्हा डोनाल्ड ट्रम्प भारतावरील कर वाढवण्याची धमकी देत आहे. तसेच दुसऱ्या बाजूला भारत आणि चीनमधील संबंध सुधारण्यावही प्रयत्न सुरु आहे. यामुळे ही भेट चीन आणि भारताच्या संबंधांना नवी चालना देऊ शकते.
भारतावरील कर
सध्या भारतावर अमेरिकेने २५% टॅरिफ लागू केले आहे. शिवाय रशियाशी (Russia) व्यापार थांबण्याचा इशाराही दिला आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी न थांबवल्या करामध्ये वाढ करण्याची धमकी दिली आहे. मात्र भारताने याला तीव्र विरोध केला आहे.
चीनवरील कर
याच वेळी अमेरिकेने चीनवर १०% कर लागू केला आहे. यापूर्वी ट्रम्प यांनी चीनवर १२५% कर लागू केला होता, त्यानंतर हा कर १४५% वाढवण्यात आला. परंतु वाटाघाटी चर्चेनंतर हा कर १०% पर्यंत करण्यात आला आहे.
डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या या भूमिकेमुळे संपूर्ण जग गोंधळात आहे. कारण ट्रम्प यांनी मित्र देश भारतावर प्रचंड कर लागू केला आहे, परंतु शत्रू देश चीनला यामधून सूट दिली आहे. यामुळे ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावर प्रश्न उपस्थित केले जात आहे. याच वेळी अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हेली यांनी देखील ट्रम्प यांना भारताशी संबंध न बिघडवण्याचा सल्ला दिला आहे.
याच वेळी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल मॉस्कोमध्ये पोहोचले आहेत. (Ajit Doval Russia Visit) ट्रम्पच्या दबावादरम्यान दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यात अमेरिकेच्या टॅरिफवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच भारत आणि रशियाशी धोरणात्मक संबंध अधिक मजबूत करण्यावरही भर दिला जाईल. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर देखील रशियाला भेट देणार आहे.
6 ऑगस्ट जगासाठी काळा दिवस! अणुबॉम्ब तयार होता..; पण ओपेनहायमर तणावात का होता?






