'Trumpना प्रशंसा आवडते, म्हणून जेव्हा Putin फोन करतात...' लीक झालेल्या फोन कॉलमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणातील गुपिते उघड ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
२६ नोव्हेंबर २०२५ रोजी ब्लूमबर्गने हा ट्रान्सक्रिप्ट प्रसिद्ध करताच जागतिक माध्यमांनी त्याची दखल घेतली. हा कॉल १४ ऑक्टोबर २०२५ रोजी व्हॉट्सॲपवरून झाला असून त्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग देखील मिळाले आहे. या संभाषणादरम्यान विटकॉफ यांनी उशाकोव्हला स्पष्टपणे सांगितले की “ट्रम्पसोबत कोणतेही मोठे काम साध्य करायचे असेल तर त्यांची स्तुती करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.” त्यांच्यानुसार, ट्रम्प यांच्याशी बोलताना पुतिन यांनी त्यांना “गाझा शांतता नायक”, “जागतिक स्थैर्याचा नेता” असे संबोधले पाहिजे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Guinea-Bissau : आता ‘या’ देशातही निवडणुकीनंतर अवघ्या तीनच दिवसात झाले सत्तापालट; सीमा केल्या बंद अन् राष्ट्रपती बेपत्ता
ट्रान्सक्रिप्टनुसार, युरी उशाकोव्ह यांनी विटकॉफला विचारले की पुतिन आणि ट्रम्प यांच्यात थेट टेलिफोनिक चर्चा घडवून आणता येईल का. त्यावर विटकॉफ यांनी सकारात्मक उत्तर देत “माझा माणूस तयार आहे” असे सांगितले. त्यांनी पुतिनने गाझा युद्धबंदीबद्दल ट्रम्प यांचे अभिनंदन करावे आणि रशिया देखील त्या निर्णयाला पाठिंबा देत असल्याचे सांगावे, अशी विशेष सूचना दिली.
A private call between Trump-appointed envoy Steve Witkoff and Putin advisor Yuri Ushakov was just leaked — and it shows the American envoy effectively acting as a strategist for Moscow. pic.twitter.com/HBiYoNCJ0h — Tim Mak (@timkmak) November 25, 2025
credit : social media
याव्यतिरिक्त, विटकॉफ यांनी संभाषणादरम्यान युक्रेन युद्धाबाबतही एक महत्त्वाची कल्पना मांडली. ते म्हणतात, “कदाचित आपण गाझासाठी जसा प्रस्ताव मांडला, तसाच २० कलमी शांतता प्रस्ताव युक्रेनसाठीही मांडू शकतो.” हे वक्तव्य जगाच्या नजरेत विशेषत्वाने ठळक ठरले आहे. या लीक कॉलनंतर फक्त दोन दिवसांनी १६ ऑक्टोबरला ट्रम्प आणि पुतिन यांची प्रत्यक्ष बैठक पार पडली होती. लीक झालेल्या ट्रान्सक्रिप्टबाबत विचारले असता ट्रम्प यांनी कोणताही विरोध दर्शवला नाही. त्यांनी हे “राजनैतिक चर्चा करण्याची सामान्य प्रक्रिया” असल्याचे सांगितले. रशियाने मात्र तीव्र प्रतिक्रिया देत म्हटले की “ही लीक युक्रेन शांतता चर्चेला कमकुवत करण्याचा प्रयत्न” आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Rare Minerals : काचिन प्रदेश नव्या भू-राजकीय रणभूमीत; म्यानमार पर्वतांमध्ये दडलेल्या दुर्मिळ खजिन्यावरून ‘या’ 3 महासत्ता आमनेसामने
या प्रकरणामुळे जगातील दोन सर्वात प्रभावशाली नेत्यांच्या पाठीमागे कोणत्या प्रकारचे संवाद चालतात, कशाप्रकारे आंतरराष्ट्रीय धोरणे तयार केली जातात, आणि वैयक्तिक ‘खुशामत’ देखील किती महत्त्वाची भूमिका बजावते, याचा पुन्हा एकदा उलगडा झाला आहे. या कॉलची वेळ, त्यातील संदेश आणि त्यानंतर लगेच झालेली बैठक या सर्वांमुळे या प्रकरणाचे महत्व अधिकच वाढले आहे. या लीकमुळे जागतिक चर्चेला नववे वळण मिळाले असून पुढील काही दिवसांत या विषयावर आणखी माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Ans: १४ ऑक्टोबर २०२५ रोजी हा व्हॉट्सॲप कॉल झाला असल्याचे ब्लूमबर्गने सांगितले.
Ans: ट्रम्पला उघडपणे स्तुती ऐकायला आवडते आणि त्याद्वारे राजनैतिक निर्णयांना दिशा दिली जाऊ शकते, हे समोर आले.
Ans: रशियाने हे युक्रेन शांतता प्रक्रियेला कमकुवत करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले.






