(फोटो सौजन्य – Pinterest)
वॉकर यांनी कंपनीच्या विक्रीतून मिळालेल्या रकमेचा एक मोठा हिस्सा, म्हणजेच सुमारे २,००० कोटी रुपये, आपल्या कर्मचाऱ्यांच्या नावावर केले. जेव्हा कर्मचाऱ्यांना या बोनसची माहिती मिळाली, तेव्हा अनेकांचा आपल्या डोळ्यांवर आणि कानांवर विश्वासच बसला नाही. सरासरी प्रत्येक कर्मचाऱ्याच्या वाट्याला सुमारे ३.७ कोटी रुपये (४ लाख ४३ हजार डॉलर्स) आले आहेत. विशेष म्हणजे, या कर्मचाऱ्यांकडे कंपनीची कोणतीही मालकी किंवा शेअर्स नव्हते, तरीही त्यांना केवळ त्यांच्या निष्ठेचे बक्षीस म्हणून ही रक्कम देण्यात आली आहे. फायबरबॉन्डचे हे यश सोपे नव्हते.
कोणी फेडले कर्ज, तर कोणी खरेदी केले घर
या निर्णयामुळे रातोरात शेकडो कुटुंबांचे नशीब बदलले आहे. कंपनीत १९९५ पासून काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याची कथा अत्यंत भावूक करणारी आहे. जेव्हा त्यांनी नोकरी सुरू केली होती, तेव्हा त्यांचा पगार तासाला फक्त ५ डॉलर्स होता. या बोनसमुळे त्यांनी आपल्या घराचे कर्ज फेडले, याशिवाय स्वतः चे कपड्यांचे बुटीकही सुरू केले. अनेक कर्मचारी जे फक्त महिन्याच्या पगारावर जगत होते, ते आता सुरक्षित भविष्याचे नियोजन करत आहेत. कोणी मुलांची कॉलेज फी भरली, कोणी रिटायरमेंट फंड मजबूत केला, तर कोणी स्वप्नातील कार खरेदी केली. जेव्हा ग्राहम वॉकर यांना विचारले गेले की ‘लोक पैसे खर्च करत आहेत’, तेव्हा त्यांनी दिलेले उत्तर मन जिंकणारे होते, तो त्यांचा पैसा आहे, त्यांनी तो कसाही वापरावा.
कंपनी विकण्यापूर्वी ठेवली होती खास अट
फायबरबॉन्ड कंपनी अमेरिकेतील दिग्गज कंपनी ‘ईटन’ने खरेदी केली आहे. मात्र, हा सौदा करताना ग्राहम वॉकर यांनी एक स्पष्ट आणि कडक अट ठेवली होती. ज्या लोकांनी कंपनीला शिखरापर्यंत पोहोचवण्यासाठी आपले रक्त आटवले, त्यांना या विक्रीच्या रकमेचा फायदा मिळालाच पाहिजे, अशी त्यांची इच्छा होती. वॉकर यांच्या मते, हा निर्णय त्या लोकांसाठी घेतला आहे जे कंपनीच्या कठीण काळातही खंबीरपणे पाठीशी उभे राहिले, ही संपूर्ण रक्कम एकाच वेळी दिली जाणार नसून, पुढील ५ वर्षात हप्त्यांच्या स्वरूपात दिली जाईल (अट अशी की त्यांनी कंपनीशी जोडलेले राहावे). जून २०२५ पासून या बोनसचा पहिला हप्ता मिळण्यास सुरुवातही झाली आहे.






