अमेरिकेची पहिली खासगी चंद्र मोहीम अयशस्वी, चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचं स्वप्न भंगलं!

अमेरिकेची पहिली खासगी चंद्र मोहीम अयशस्वी झाली आहे. जर सर्व काही ठीक झाले असते तर 23 फेब्रुवारीला हे लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले असते, परंतु तांत्रिक बिघाडामुळे हे अभियान अयशस्वी झाले आहे.

  चंद्रावर पोहोचणारा दुसरा देश अशी ओळख असणाऱ्या बलाढ्य अमेरिकेत नेहमीच अंतराळाशी संबधित प्रयोग होत असतात. नुकतचं अमेरिकेतील एका खासगी कंपनीनं चंद्र मोहीम आखली होती. मात्र, दुर्देवाने अमेरिकेची पहिली खासगी चंद्र मोहीम (Moon Lander Mission) यशस्वी होऊ शकली नाही  लँडरमधील तांत्रिक बिघाडामुळे हे अभियान अयशस्वी झाल्याचं सांगण्यात येत आहे. अॅस्ट्रोबोटिकनची या खासगी कंपनी ही मोहीम होती. या प्रकरणी चौकशी सुरू असून रॉकेटच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे,  कंपनीने असेही म्हटले आहे की हे लँडर यापुढे चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करू शकणार नाही.

  अमेरिकेचं पहिलं खासगी मिशन अयशस्वी

  सुमारे 51 वर्षांनी अमेरिकेने चंद्र मोहीम सुरू केली, ज्यासाठी खासगी क्षेत्रातही अनेक अपेक्षा होत्या. इंजिनमध्ये बिघाड झाल्यानंतर अमेरिकेचे पहिले खासगी मिशन अयशस्वी झाल्याचे या मिशनशी संबंधित लोकांनी मान्य केले आहे. अॅस्ट्रोबोटिक या लँडरची निर्मिती करणाऱ्या कंपनीने म्हटले आहे की, फ्लोरिडा येथील केप कॅनवेरल स्पेस फोर्स स्टेशनवरून युनायटेड लॉन्च अलायन्स रॉकेट वल्कनवर लँडरचे प्रक्षेपण करण्यात आले. परंतु प्रक्षेपणानंतर सुमारे 7 तासांनंतर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लँडर मोहीम अयशस्वी झाली. कंपनीने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

  आता सॉफ्ट लँडिंग शक्य होणं नाही

  वृत्तानुसार, रॉकेट इंजिनमध्ये बिघाड हे या मिशनच्या अपयशाचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. रॉकेटमध्ये आता फक्त 40 तासांचे इंधन शिल्लक आहे, हे स्पष्ट करते की सॉफ्ट लँडिंग आता शक्य नाही. यूएस सरकारनेही या मिशनला पाठिंबा दिला आणि कंपनीला सुमारे $100 दशलक्ष दिले. त्यानंतर अॅस्ट्रोबॉटिक कंपनीचे सीईओ म्हणाले की, आमची मोहीम यशस्वी झाल्यास खासगी कंपनीचे चंद्रावर पहिले सॉफ्ट लँडिंग असेल.

  1972 मध्ये अपोलो मोहीम सुरू झाली

  यापूर्वी अमेरिकेनं 1972 मध्ये चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केलं होतं. त्यानंतर अपोलो 17 चंद्रावर उतरले आणि अमेरिकेने ध्वज फडकावला. मात्र 51 वर्षांनंतर अमेरिकेचा हा प्रयत्न फोल ठरला आहे.