नोबेल शांतता पुरस्कारासाठी मेलानिया ट्रम्प पात्र? अमेरिकन नेत्याच्या दाव्याने उडाली खळबळ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Melania Trump News in Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना अनेक दिवसांपासून नोबेल शांतता पुरास्कारासाठी नामाकिंत करण्याचा चर्चा सुरु होत्या. ट्रम्प यांनी जगातील सात युद्ध थांबवली आहेत. यामुळे ट्रम्प या पुरस्कारास पात्र असल्याचे काही तज्ज्ञांनी म्हटले होते. दरम्यान आता यामध्ये एक नवा ट्विस्ट आला आहे.
आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्काराठी नामांकित केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. फ्लोरिडा येथील रिपब्लिकन प्रतिनिधी ॲनापोलिना लुना यांनी एक मोठा खळबळदजनक दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प या देखील नोबेल शांतता पुरस्कारासाठी पात्र आहेत.
यामागचे कारण देताना सांगितले की, त्यांनी युक्रेनशी संबंधित शांतता प्रयत्नांमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. यामुळे नोबेल शांतता पुरस्कारासाठी मेलानिया ट्रम्प पात्र आहेत. अमेरिकन नेत्याच्या या दाव्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, ॲनापोलिना लुना यांनी मुलाखतीदरम्यान युक्रेनमधील शांततेच्या प्रगतीमध्ये मेलानिया ट्रम्प प्रमुख कारण ठरु शकतता. त्यांनी रशियासोबतच्या अमेरिकेच्या संवादादरम्यान महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. रशिया आणि युक्रेनच्या शांतता चर्चेतही अमेरिकेसोबत त्या सहभागी होऊ शकतात असा दावा ॲनापोलिना लुना यांनी केली आहे.
दरम्यान काही तज्ज्ञांच्या मते, रशियाचे अध्यक्ष व्लादामिर पुतिन आणि डोनाल्ड ट्रम्प यांची अलास्कामध्ये भेट झाली होती. या भेटीदरम्यान युक्रेन युद्धावर चर्चा झाली. पण कोणताही ठोस निर्णय झाला नाही. यावेळी ट्रम्प यांनी त्यांच्या पत्नीचे एक पत्र पुतिन यांनी दिले. या पत्रात मेलानिया ट्रम्प यांनी रशिया युक्रेन युद्धामुळे प्रभावित झालेल्या मुलांच्या संरक्षणाचे आवाहन पुतिन यांना केले होते. पण यावरुन मेलानिया ट्रम्प यांना नोबेल पुरस्कारासाठी नामांकित केले जाईल का? यावर सध्या प्रश्नचिन्हच आहे.
सध्या डोनाल्ड ट्रम्प यांना या पुरस्कारासाठी अनेक देशांनी नामांकित केले आहे. यामध्ये रवांडा, इस्रायल, गॅबॉन, अझरबैजान, आणि कंबोडियाचा समावेश आहे. शिवाय पाकिस्तानच्या लष्करप्रमुखे असीम मुनीर यांनी देखील ट्रम्प यांना या पुरस्कारासाठी नामांकित केले आहे.
FAQs (संबंधित प्रश्न)
नोबेल शांती पुरस्कार हा जगातील सर्वाति प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक आहे. हा पुरस्कार दरवर्षी नॉर्वेतील नार्वेजियन नोबेल समितीद्वारे प्रदान केला जातो.
नोबोल पुरस्कारासाठी नामांकन करण्याचा अधिकार विशिष्ट व्यक्तींनाच असतो. नामांकन करण्याचा अधिकार हा एखाद्या देशाचे पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष मंत्री आणि संसद सदस्याला असतो. तसेच आंतरराष्ट्रीय न्यायालय व स्थायी मध्यस्थता न्यायालयाचे सदस्यही यासाठी नामांकन करु शकतात. विशिष्ट विद्यापीठांचे प्राध्यपकक, रेक्टर आणि संचालक, शांती संशोधन संस्था आणि परराष्ट्र धोरण संस्थांचे प्रमुख, नोबेल शांती पुरस्कार विजिते, प्रतिनीधी, तसेच नॉर्वेजियन नोबेल समितीचे सदस्य आणि सल्लागारांनाही हा अधिकार असतो.
ट्रम्प यांना शांतता नोबेल पुरस्कार मिळणार? कोणाला प्रदान केला जातो हा सन्मान? जाणून घ्या