PhotoCredit- Social Media
अमेरिका: अमेरिकन ज्योतिषी एमी ट्रिप यांनी अमेरिकेच्या निवडणुकीपूर्वी एक भविष्यवाणी करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे . डोनाल्ड ट्रम्प हेच अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष होणार असल्याचे भाकीत त्यांनी केले आहे. एमी ट्रिप यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन कोणत्या तारखेला आपली उमेदवारी मागे घेतील, यावरही त्यांनी भाष्य केले होते. त्यानंतर आता कमला हॅरिस निवडणुकीत उतरल्याने ट्रम्प यांना कोणताही वॉकओव्हर नसेल, पण तरीही तेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होतील. पण जो बायडेन यांच्या राजीनाम्याची मागणी वाढत असली तरी ते त्यांचा कार्यकाळ नक्कीच पूर्ण करतील असाही दावा ज्योतिषी एमी ट्रिप यांनी केला आहे.
हेदेखील वाचा: रस्त्यावर उतरून महिला शोधू लागली नवरा; व्हिडीओ व्हायरल
एमी म्हणाल्या, “मी अमेरिकेची जन्म पत्रिका पाहिली आहे. मी त्यात काही गोष्टी पाहिल्या आहेत ज्या हिंसा आणि अराजकतेकचे संकेत देत आहेत. एखाद्या प्रकारच्या संघर्षामुळे राजकीय अस्थिरता येईल. पण ही अस्थिरता अंतर्गत असेल की बाह्य गोष्टींचाही यात संबंध असेल, हे लगेच सांगता येणार नाही.
निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केल्याने हिंसाचार होऊ शकतो, कमला हॅरिसऐवजी मिशेल ओबामा ट्रम्प यांच्यासमोर असत्या तर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे नुकसान झाले असते, असेही एमी ट्रिप यांनी नमुद केले. तसेच देश प्रत्यक्षात महिला राष्ट्रपतीसाठी तयार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
हेदेखील वाचा: पृथ्वीवर पडणारी वीज अंतराळातून कशी दिसते?; अंतराळवीराने शेअर केलेला फोटो एकदा पाहाच