Photo Credit: @dominickmatthew
अमेरिका: नासाचे अंतराळवीर मॅथ्यू डॉमिनिक यांनी अंतराळातून भारताचे दुर्मिळ छायाचित्र शेअर केले आहे. वीज पडली की अवकाशातून भारताचा नजारा कसा दिसतो हे दाखवण्याचा प्रयत्न या फोटोमध्ये करण्यात आला आहे. अंतराळवीर मॅथ्यू डॉमिनिकने 17 ऑगस्ट रोजी X वर भारताचा दुर्मिळ फोटो शेअर केला होता. हा फोटो सोशल मीडियावर 10 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. या चित्रात विजेचा अनोखा नजारा दाखवला आहे. फोटोमध्ये काही ठिपके दिसत आहेत, ते भारतातील वेगवेगळ्या शहरांचे आहेत.
हेदेखील वाचा: क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का… डिज्नी हॉटस्टार बंद होणार
अंतराळवीर मॅथ्यू डॉमिनिकने X हँडलवर फोटो शेअर केला आणि लिहिले, ‘भारतात रात्रीच्या वेळी वीज चमकत होती, फोटोमध्ये प्रकाश टिपण्याचा प्रयत्न करताना मी बर्स्ट मोडचा वापर केला. फ्रेमवर प्रकाश पडेल अशी माझी अपेक्षा होती. फ्रेमच्या मध्यभागी विजेचा प्रकाश पडला तेव्हा मला खूप आनंद झाला. हा फोटो क्रॉप करण्याची गरज नाही. या चित्राच्या खालच्या मध्यभागी, पाण्यात उभ्या असलेल्या बोटीतील प्रकाश आपण स्पष्टपणे पाहू शकता, जे पातळ रेषांसारखे दिसतात. मॅथ्यू डॉमिनिकचा हा फोटो अत्यंत दुर्मिळ मानला जातो, ज्यामध्ये आपल्या विश्वाच्या सौंदर्याची आणि आश्चर्याची झलक आहे.
हेदेखील वाचा: एकतर्फी प्रेम! ‘तू माझ्यावर प्रेम कर…’, तरुणाच्या त्रासाला कंटाळून 17 वर्षीय मुलीने संपवल आयुष्य
सोशल मीडिया यूजर्स या फोटोला खूप खास आणि इंटरेस्टिंग म्हणत आहेत. या पोस्टवर हजारो कमेंट्स आल्या आहेत. या फोटोवर कमेंट्सही व्हायरल होत आहेत. नासा अनेकदा अशी छायाचित्रे शेअर करत असते. नासाचे हे छायाचित्रही लोकांना खूप आवडले आहे.
Lightning at night over India.
When trying to capture lighting in an image I use burst mode and hope lighting strikes in the frame. I was super happy when this lightning strike ended up in the middle of the frame. No crop needed.
1/5s, 85mm, f1.4, ISO 6400 pic.twitter.com/OTSVLSBcQP
— Matthew Dominick (@dominickmatthew) August 17, 2024