सिडनी हल्ल्याचा मुंबई २६/११शी संबंध? दहशतवाद्यांनी 'या' खास व्यक्तीला केले टार्गेट (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, सिडनीतील हल्ल्यात ४१ वर्षीय रब्बी एली श्लांजरला ठार करण्यात आले आहे. २००८ मध्ये झालेल्या २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याशी याचा थेट संबंध जोडला जात आहे. श्लांजर हा २६/११ मध्ये शहीद झालेल्या चाबाड मिशनच्या स्मरणार्थ कार्यक्रमात सहभागी झाला होता. यामुळेच त्याची दहशतवाद्यांनी हत्या केली असल्याचे म्हटले जात आहे. बोंडी बीचवर हनुक्का उत्सव साजरा करण्यासाठी ज्यू समुदायाचे लोक मोठ्या संख्येने जमले होते. यावेळी त्यांच्यावर रक्तरंजित प्रहार करण्यात आला. पण हा हल्ला रब्बी श्लांजरला लक्ष्य करुन करण्यात आला होता.
रब्बी श्लांजर गेल्या १८ वर्षांपासून सिडनी येथे चाबाड बोंडी येथे सहाय्यक रब्बी म्हणून कार्यरत होता. त्याच्या चुलत भावाने रब्बीच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. त्याच्या पाश्चात्य पत्नी, दोन लहान आणि मुले आणि मोठा परिवार आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या यहुदी परिषदेचे सीईओ अॅलेक्स रविचत यांनी सांगितले की, श्लांजर हे तुरुंगातील कैद्यांना भेट देत, वृदधांसोबत वेळ घालवत, तसेच गरजूंना मदत करत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोंडी बीच परिसराती हल्ला हा पाकिस्तानी नागरिक बाप-लेकाच्या जोडीने घडवून आणला आहे. चकामकीत वडीलांचा मृत्यू झाला आहे. तर मुलाला अटक करण्यात आली आहे. या २४ वर्षीय आरोपीचे नाव नवीद अकमरम असून हा पाकिस्तानी नागिरका असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नवीद हा पाकिस्तानी लष्करातील निवृत्त जनरल सादिक अकरम यांचा मुलगा असल्याचा दावा करण्यात आला आहे. या हल्ल्यात २ पोलिस अधिकारी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर संपूर्ण ऑस्ट्रिलेयातील धार्मिक स्थळांची सुरक्षितता कडक करण्यात आली आहे.
Ans: यामागचे कारण म्हणजे सिडनीतील हल्ल्यात रब्बी श्लांजर या व्यक्तीला ठार करण्यात आले असून ते नुकतेच २००८ मध्ये २६/११ ला झालेल्या मुंबई हल्ल्याच्या चाबाड चाबाड मिशनशी जोडले गेले होते.
Ans: ऑस्ट्रेलियाच्या सिडीन परिसरातील बोंडी बीचवर झालेल्या दोन आरोपीं पाकिस्तानी नागरिका बाप-लेकाच्या जोडीचा समावेश आहे.
Ans: यहुदी समुदायाच्या पवित्र सण हनुक्का साजरा केला जात असताना बोंडी बीचवर हल्ला करण्यात आला होता. यामुळे हा हल्ला दहशतवादी हल्ला मानला जात आहे.






