हातकड्या घातल्या, जमिनीवर आपटले अन्...; अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या इमिग्रेशन धोरणाविरुद्ध तीव्र आंदोलने सुरु आहे. लॉस एंजलिसमधील निदर्शनांनी हिंसक वळण घेतले आहे. परंतु ट्रम्प प्रशान त्यांचे धोरण मागे घेण्यास तयार नाहीत. याच वेळी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेत अमानुष वागणूक दिली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याला बेड्या घातल्या आहे, त्याला जमिनीवर लोटले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान भारतीय दूतानवासाने देखील या प्रकरणाची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.
हा व्हिडिओ अमेरिकन उद्योगपती कुणाल जैन यांनी सोशल मीडियावहर शेअर केला आहे. त्यांनी एक्सवरील आपल्या पोस्टमध्ये नेवार्क विमानतळावर एका भारतीय विद्यार्थ्यांला हातकड्या घातलेल्या, त्याला एक गुन्हेगाराप्रमाणे वागणूक दिली जात होती. विद्यार्थी अमेरिकेत त्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आला होता. त्यांनी सांगतिले की, विद्यार्थी सतत रडत होता, तो वेडा नाहीये हे ओरडून ओरडून सांगत होता, परंतु त्याचे कोणीही ऐकले नाही. त्याला जबरदस्तीने वेडा सिद्ध करण्याचा प्रयत्न सुरु होता.
त्यानंतर कुणाल जैन यांनी भारतीय दूतावासाची संपर्ख साधला. अमेरिका आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस .जयशंकर यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत अशा घटना सातत्याने घडत आहे.
I witnessed a young Indian student being deported from Newark Airport last night— handcuffed, crying, treated like a criminal. He came chasing dreams, not causing harm. As an NRI, I felt helpless and heartbroken. This is a human tragedy. @IndianEmbassyUS #immigrationraids pic.twitter.com/0cINhd0xU1
— Kunal Jain (@SONOFINDIA) June 8, 2025
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, नेवार्क मधील भारतीय दूतावासाने या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली. भारतीय दूतावासाने म्हटले की, त्यांनी सोशल मीडियावर अशा अनेक पोस्ट आढळल्या आहे. या व्हिडिओंमध्ये दावा करण्यात आला आहे की, नेवार्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक बारतीय नागरिकाला अडचणींचा सामाना करावा लागला. सध्या आम्ही या संदर्भात स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत. भारतीय वाणिज्य दूतावास नागरिकांच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक भारतीयांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच अनेकांनी सांगितले की, अमेरिकेतील प्रत्येक शहरात हीच परिस्थिती आहे. अधिकारी कोणाचेही ऐकत नाहीत, तसेच नागरिकांशी अमानुष वागणूक दिली जात आहे.
या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. अद्याप यावर अमेरिकेच्या ट्रम्प सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. ट्रम्प यांनी इमिग्रेशन कारवाई अंतर्गत शेकडो भारतीयांना भारतात परत पाठवले आहे. यापूर्वी देखील एक व्हिडिओ व्हायरल झाला होत्या, ज्यामध्ये भारतीयांना साखळदंड बांधून ओढून नेले जात होते.जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- लॉस एंजलिसमध्ये तैनात नॅशनल गार्ड म्हणजे काय? कोणाला असतो सैनिकांना आदेश देण्याचा अधिकार?