Baba Venga Prediction : दीड वर्षानंतर पृथ्वीवरुन नाहीशी होणार उपासमारी? काय आहे बाबा वेंगाचं 'ते' भाकित, सर्वत्र उडाली खळबळ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सध्या जग विनाशाच्या उबंरठ्यावर आहे. एककीडे रशिया-युक्रेन, इराण-इस्रायल युद्ध तीव्र होत आहे. तर दुसरीकडे अनेक भयावह अपघातांच्या घटना घडत आहेत. यामध्ये लाखो लोकांचा बळी जात आहे. अशा परिस्थिती बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्यांनी देखील खळबळ उडाली आहे.त्यांनी आतापर्यंत केलेली अनेक भाकित खरी ठरली आहेत. अशातच त्यांचे आणखी एक भाकित समोर आले आहे, यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
बाबा वेंगा यांनी 2028 साठी एक भाकीत केले आहे. त्यांनी त्यांच्या ‘द फ्यूचर एज आय सी इट’ या पुस्तकात त्यांची भाकीत लिहिली आहे. यामध्ये दावा करण्यात आला आहे की, आजापासून 900 दिवसांनी पृथ्वीवरुन उपासमार नाहीशी होणार आहे. तसेच एका नवीन उर्जेचा शोध लागणार आहे. या भाकिताने खरं तरं दिलासा मिळाला आहे. जागतिक उर्जा संकटामध्ये सध्या जग अडकला आहे. यामुळे नवीन उर्जेचा शोधामुले या संकटावर मात करता येईल.
यामध्ये न्यूक्लियर फ्यूजन, हायड्रोजन एनर्जी किंवा क्वांटम बॅटरीसारख्या तंत्रज्ञानाचा सोध लागले. तसेच आणखी एक महत्त्वपूर्ण भविष्यवाणी म्हणजे मनुष्य शुक्र ग्रहावर पोहोचेल आणि तिथे नवीन जीवनाचा शोध घेतला जाईल. त्यांच्या या भाकितानं सध्या सर्वत्र खळबळ उडाली आहे.
जपानी रियो तात्सुकी म्हणजे जपानी वेंगा बाबा यांचा जन्म 1911 मध्ये बल्गेरियात झाला होता. त्यांचे खरे नाव व्हॅंजेलिया पांडेवा दिमित्रोवा आहे. बालपणी एक अपघातात त्यांनी आपली दृष्टी गमावली. त्यानंतर त्यांना एक रहस्यमय शक्तीचा अनुभव झाला. या शक्तीमुळे त्यांना भविष्य पाहता आले असे म्हटले जाते.युपरोपमध्ये त्यांना बाल्कनचा नोस्ट्राडेमस म्हणून ओखळले जाते.
बाबा वेंगा यांनी यापूर्वी केलेली अनेक भाकितं जवळपास खरी ठरली आहेत. त्यांनी 9/11 च्या वर्ड ट्रेड सेंटवरील हल्ला, कोव्हिड व्हायरस, तसेच 2004 मधील विनाशकारी त्सुनामी आणि राजकुमारी डायनाच्या मृत्यूबाबत अशी अनेक भाकिते केली होती. ही भाकिते कालांतराने खरी ठरली. त्यांच्या भाकिताने सर्वत्र खळबळ उडाली. यामुळे त्यांना लोकप्रियता देखील मिळाली.
याशिवाय त्यांनी 2030 मध्ये आणखी एका विषाणूच्या धोक्याचा इशार दिला आहे. तसेच 2025 मध्ये जपानमध्ये भयंकर भूकंपाची भविष्यवाणी देखील केली आहे. परंतु जपानने या भविष्यवाणीला खोटे आणि निराधार असल्याचे म्हटले आहे. जपानने अशा कोणत्याही वैज्ञानिक आधार नसलेल्या घटनेवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन लोकांना केले आहे. त्यांनी 2033 मध्ये हवामान बदलामुले समुद्रपातळीत वाढ होण्याची शक्यतेचा देखील इशार दिला आहे. तसेच 2043 मध्ये युरोपवर इस्लाम राजवटीचा राज असणार असल्याचेही त्यांनी त्यांच्या पुस्तकात मांडले आहेत. परंतु याबरोबच विज्ञानाधारित माहिती आणि अधिकृत सुचनांकडे लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे.