ट्रेन हायजॅकमध्ये कॅप्टन रिझवानलाही ओलीस ठेवलं होतं, बीएलएचा दावा; पाकिस्तानी लष्कराने सांगितले- ऑपरेशन पूर्ण झाले ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
बलुचिस्तान : पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये जफर एक्सप्रेस ट्रेनचे अपहरण करण्यात आले आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) ने जबाबदारी स्वीकारत असा दावा केला आहे की ट्रेनमध्ये 214 पाकिस्तानी सैनिकांसह एकूण 426 प्रवासी होते. वृत्तानुसार, आतापर्यंत 60 सैनिक मारले गेले आहेत, तर 150 अजूनही ओलीस आहेत. तसेच बीएलएच्या ताब्यात 43 पंजाब रेजिमेंटशी संलग्न असलेला पाकिस्तानी लष्कराचा एक वरिष्ठ अधिकारी कॅप्टन रिझवान आहे.
पाकिस्तानी लष्कराने ही कारवाई संपल्याचे जाहीर केले आहे. यादरम्यान 21 प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आले असून चार निमलष्करी दलांचे जवान मारले गेले. लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी कारवाईदरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेल्या सर्व ३३ बंडखोरांना ठार केले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : जग व्यापारी युद्धाच्या छायेत; लवकरच इतिहासातील सर्वात मोठी बाजारपेठ घसरण होण्याची शक्यता
फ्रंटियर कॉर्प्सचे चार जवान शहीद झाले
सशस्त्र दलांनी सर्व दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती लेफ्टनंट जनरल शरीफ यांनी दिली. ते म्हणाले की, मंगळवारी बंडखोरांनी ट्रेनवर हल्ला केला, ज्यामध्ये 21 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यात निमलष्करी दल फ्रंटियर कॉर्प्सचे चार जवानही शहीद झाले. लेफ्टनंट जनरल शरीफ यांच्या म्हणण्यानुसार, लष्कराने प्रत्युत्तर देत सर्व 33 दहशतवाद्यांना ठार केले आणि ओलिसांची सुखरूप सुटका केली.
बलुचिस्तान प्रांतात बीएलएने ट्रेनचे अपहरण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. तथापि, गेल्या वर्षी संघटनेने प्रांतातील विविध भागात सुरक्षा दल, आस्थापना आणि परदेशी नागरिकांवर हल्ले तीव्र केले.
रेल्वे सेवा नुकतीच पूर्ववत करण्यात आली
दीड महिन्यांहून अधिक काळ बंद ठेवल्यानंतर पाकिस्तान रेल्वेने क्वेटा ते पेशावर रेल्वे सेवा पूर्ववत केली होती. बीएलएने एक निवेदन जारी करून पाकिस्तानी लष्कराने कोणतीही कारवाई केल्यास सर्व ओलीस ठार केले जातील, असा इशारा दिला होता.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अपहरण, खून, बलात्कार, पाकिस्तानी लष्कराने बलुचिस्तानच्या छातीवर कसा केला वार? जाणून घ्या बलोचांच्या बलिदानाची कहाणी
पाकिस्तान, ब्रिटन आणि अमेरिकेने बंदी घातलेल्या या गटाच्या कारवाया अलीकडच्या काळात वाढल्या आहेत. बलुचिस्तानमध्ये गेल्या वर्षभरात हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. नोव्हेंबरमध्ये क्वेटा रेल्वे स्थानकावर आत्मघातकी हल्ला झाला होता, ज्यामध्ये हल्लेखोराने स्वत:ला बॉम्बने उडवले होते. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला, तर 62 जण जखमी झाले. या घटनेनंतर रेल्वेने अनेक सेवा तात्पुरत्या बंद केल्या.