गद्दारांना माफी नाही! एकच चूक अन् ट्रम्प सरकारच्या अधिकाऱ्याला गमवावी लागली खुर्ची; नेमकं प्रकरण काय? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर ट्रम्प यांनी अनेक खळबळजनक निर्णय घेतले आहेत. ट्रम्प यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अमेरिकन प्रशासनात अनेक मोठे बदल केले आहे. याच वेळी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या प्रशासनातील एका व्यक्तीला काडून टाकले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकेल वॉल्टज आणि त्यांचे प्रमुख डिप्टी अॅलेक्स वोंग या दोघांना काढून टाकले आहे.
इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही अधिकारी लवकरच आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. हा निर्णय अशा वेळी घेण्यात आला आहे, जेव्हा येमेनमधील हुथी बंडखोरांविरोधातील अमेरिकेच्या कारवाईची गुप्त माहिती लिक झाली होती. ही माहिती लिक केल्याचा आरोप मायकेल वॉल्टज आणि त्यांचे प्रमुख डिप्टी अॅलेक्स वोंग या दोन्ही अधिकाऱ्यांवर आहे.
मायकेल वॉल्टज फ्लोरिडा येथे रिपब्लिकन पक्षाचे माजी खासदार होते. त्यानंतर ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारच्या पदी निवड करण्यात आली. पण अलीकडेचे त्यांनी अटलांटिक मासिकाचे संपादक जेफ्री गोल्डबर्ग यांना व्हाईट हाईच्या एका गुप्त ग्रुपमध्ये चुकून सामील केले. या ग्रुपमध्ये येमेन आणि हुथी बंडखोरांविरोधात अमेरिकन रणनीती आखली जात होती. ही माहिती लिक झाल्याने मोठा गोंधळ उडाला होता. ही एकच चूक वॉल्टज यांनी भारी पडली. यामुळे वॉल्टज यांच्यावर टीकांचा भडिमार झाला.
या प्रकरणानंतर प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या चूकीला ऑपरेशनल सिक्युरिटीचा भंग म्हटले. अनेकांनी वॉल्टड यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतील झालेली ही चूक अत्यंत घातक ठरली. यामुळे ट्रम्प यांच्या विश्वासार्हतेवर देखील प्रश्न उपस्थित झाले.
डिप्टी ॲलेक्स वोंग यांनाही पदावरुन काढून टाकण्यात आले आहे. बोंग हे ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळापासून त्यांचे विश्वासू सहाकारी होते. वोंग यांची इंडो-पॅसिफिक धोरण आणि अमेरिकेच्या जागतिक संबंधांमध्ये महत्वाची भूमिका होती. यामुळे त्यांचा राजीनामा व्हाईट हाऊससाठी मोठी धक्कादायक बाब मानली जात आहे.दरम्यान व्हाईट हाऊसकडून या प्रकरणावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. ट्रम्प प्रशासन सध्या नवीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या नियुक्तवर लक्ष देत आहे. ट्रम्प यांचा हा निर्णय जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अत्यंत निर्णायक मानला जात आहे.