ओटावा– कॅनडात कोरोना लसीकरणाला होत असलेला विरोध आता पंतप्रधान जस्टिन टुडो यांच्या निवासस्थानापर्यंत पोहचला आहे. राजधानी ओटावात आंदोलोन करणाऱ्या ट्रक डायव्हरांनी टुडो यांच्या घराला घेराव घातला आहे. मात्र यापूर्वीच टुडो त्यांच्या कुटुंबीयांसह सुरक्षित स्थळी रवाना झाले आहेत. फ्रीडम कॉन्व्हाय नावाने सुरु झालेले हे आंदोलन, देशात लॉकडाऊन लावण्यास आणि कोरोना लसीकरण बंधनकारक करण्याच्या विरोधात आहे.
ट्रक ड्रायव्हरांची ७० किमीचा रांग
हजारोंच्या संख्येने ट्रक ड्रायव्हर आणि आंदोवनकर्ते नागरिक शनिवारी राजधानी ओटावात एकत्र आले. पंतप्रधान वासस्थानाला ५० हजार ट्रक ड्रायव्हरांनी, त्यांच्या २० हजार ट्रक्स सहित घेरले आहे. लसींचे बंधन आणि इतर आरोग्य प्रतिबंध मागे घेण्यात यावेत, अशी त्यांची मागणी आहे. या आंदोलनकर्त्यांसोबत लहान मुले, वृद्ध आणि अपंगही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. पंतप्रधानांच्या विरोधात अश्लील घोषणाबाजीही करण्यात आली.
सैन्य अधिकाऱ्यांनी केली आंदोलनाची निंदा
काही आंदोलोनकर्ते हे वॉर मेमोरियलवर नाचत असताना आढळून आले, या कृत्यावर टॉप सोल्जर जनरल आणि संरक्षणमंत्र्यांनी टीका केली आहे. कडाक्याच्या थंडीच्या इशाऱ्यातही, शेकडो आंदोलनकर्ते हे पार्लमेंट परिसरात घुसण्याची आणि हिंसाचार करण्याची शक्यता आहे, त्यामुळे पोलीस दलाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. लसीकरण बंधनकारक करण्यापूर्वी, पंतप्रधानांनी ट्रक ड्रायव्हर हे देशासाठीच नव्हे तर इतर नागरिकांसाठीही धोकादायक झाले असल्याचे वक्तव्य केले होते.