• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Ceasefire Breaks Houthis Target Israel With Missiles

युद्धबंदीनंतर पुन्हा तणाव! आता येमेनच्या हुथींनीही इस्रायलवर डागले क्षेपणास्त्र; बेन गुरियन विमानतळाजवळ घबराट

Houthis target Israel missiles : मात्र केवळ चार दिवसांतच येमेनमधील हुथी बंडखोरांनी इस्रायलवर पुन्हा क्षेपणास्त्र डागल्याने संपूर्ण देशात घबराट पसरली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jun 28, 2025 | 01:45 PM
ben gurion airport attack today

युद्धबंदीनंतर पुन्हा तणाव! आता येमेनच्या हुथींनीही इस्रायलवर डागले क्षेपणास्त्र; बेन गुरियन विमानतळाजवळ घबराट ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Houthis target Israel missiles : इराणसोबत १२ दिवस चाललेल्या युद्धानंतर इस्रायलने काहीसा दिलासा घेतला होता. मात्र केवळ चार दिवसांतच येमेनमधील हुथी बंडखोरांनी इस्रायलवर पुन्हा क्षेपणास्त्र डागल्याने संपूर्ण देशात घबराट पसरली आहे. हा हल्ला इस्रायलच्या दक्षिणेकडील भागात करण्यात आला असून, यावेळी हवाई इशारे (सायरन) वाजवण्यात आले आणि हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय करण्यात आली.

शनिवारी इस्रायली लष्कराने जाहीर केले की, येमेनच्या दिशेने डागले गेलेले क्षेपणास्त्र हे बेन गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अत्यंत जवळ, फक्त ७५ मीटर अंतरावर पडले. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जिवितहानी झाली नसली, तरी सुरक्षेच्या दृष्टीने मोठा इशारा मानला जात आहे. इस्रायलमधील एकमेव प्रमुख विमानतळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या केंद्रावर झालेला संभाव्य हल्ला अत्यंत गंभीर आहे.

इराणसोबत युद्धबंदी, पण येमेनकडून हल्ला

१३ जूनपासून सुरू असलेले इस्रायल-इराण युद्ध २४ जून रोजी युद्धबंदीनंतर थांबले होते. मात्र त्यानंतर अवघ्या चार दिवसांतच, येमेंमधून हुथी बंडखोरांकडून पुन्हा हल्ला करण्यात आला. हे क्षेपणास्त्र दक्षिण इस्रायलमध्ये डागण्यात आले, ज्यामुळे विमानतळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. इस्रायली लष्कराने सांगितले की, हल्ल्याचे स्रोत, उद्दिष्ट आणि परिणाम यांची चौकशी सुरू असून, धोका निष्प्रभ करण्यासाठी सर्व उपाययोजना राबवण्यात येतील.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : युद्ध आहे की Meme War! ‘Daddy शिवाय पर्याय नाही…’ इराणने डोनाल्ड ट्रम्पचे नाव घेऊन इस्रायलला डिवचले

गाझा युद्धानंतर वाढलेला तणाव

ऑक्टोबर २०२३ मध्ये गाझा पट्ट्यावरील युद्ध सुरू झाल्यापासून येमेंमधील हुथी बंडखोर आणि इस्रायल यांच्यातील तणाव वाढत चालला आहे. गाझाच्या लोकांसाठी पाठिंबा दर्शवताना, हुथींनी इस्रायली मालकीच्या जहाजांवर लाल समुद्रात हल्ले सुरू केले आणि वेळोवेळी इस्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्रे डागली. अमेरिका आणि इस्रायलने मिळून हुथी बंडखोरांवर जोरदार हवाई हल्लेही केले होते, परंतु तरीही या गटाने आपले हल्ले सुरू ठेवले आहेत. यापूर्वी, मे महिन्यातही हुथींनी इस्रायलच्या हवाई संरक्षण यंत्रणेला चकवून तेल अवीवजवळ बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागले होते.

🚨 Sirens sounding in southern Israel following projectile fire from Yemen 🚨

— Israel Defense Forces (@IDF) June 28, 2025

credit : social media

बेन गुरियन विमानतळाजवळ तणावाची स्थिती

बेन गुरियन विमानतळाजवळ क्षेपणास्त्र पडल्याने अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द किंवा वळवावी लागली. सुरक्षा यंत्रणा आणि वैमानिक यांच्यासाठी ही घटना अत्यंत धोकादायक मानली जात आहे. ज्या ठिकाणी हे क्षेपणास्त्र पडले, ते टर्मिनल-३ पासून अवघ्या काही मीटर अंतरावर होते. विशेष म्हणजे, ही घटना इस्रायलच्या संरक्षण व्यवस्थेची कमजोरी उघड करते, कारण याआधी अनेक वेळा हुथी हल्ले हवेतच निष्प्रभ करण्यात आले होते. मात्र या घटनेमुळे स्पष्ट होते की, हुथी गटाची क्षेपणास्त्र क्षमता आणि उद्दिष्ट अचूकतेने हल्ला करण्यासाठी सक्षम आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंता

या घटनेनंतर अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देशांनी इस्रायलला आपले समर्थन जाहीर केले असून, येमेनच्या हुथींविरोधात कारवाईसाठी समर्थनही दर्शवले आहे. मिडल ईस्टमधील तणावाचे वातावरण पुन्हा चिघळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Canada-China Relations : कॅनडाचा चीनवर मोठा घाव! ‘या’ कंपनीला देशातून हाकलले, राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

 युद्धबंदी असली तरी शत्रू सावध!

इराणसोबत युद्ध थांबले असले, तरी इस्रायलच्या सुरक्षेसमोर नवीन आव्हाने कायम आहेत. येमेनमधून झालेला हल्ला केवळ भौगोलिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर राजकीय आणि लष्करी दृष्टीनेही गंभीर आहे. इस्रायलसाठी आता मोठी जबाबदारी आहे – देशांतर्गत शांतता राखण्याची आणि बाह्य शत्रूंना आक्रमणाच्या आधी रोखण्याची!

Web Title: Ceasefire breaks houthis target israel with missiles

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2025 | 01:45 PM

Topics:  

  • Iran Israel Conflict
  • Iran-Israel War
  • Israel

संबंधित बातम्या

Video: पाणी, हवा जमीन! इराणने दाखवली आपली ताकद; 1 मिनिटांत डागली ‘इतकी’ घातक मिसाईल्स, जग हादरले
1

Video: पाणी, हवा जमीन! इराणने दाखवली आपली ताकद; 1 मिनिटांत डागली ‘इतकी’ घातक मिसाईल्स, जग हादरले

Sustainable Power1404 : ‘अणु चर्चेला विलंब, लष्करी कवायत सुरू…’ इराण देत आहे नक्की कशाचे संकेत?
2

Sustainable Power1404 : ‘अणु चर्चेला विलंब, लष्करी कवायत सुरू…’ इराण देत आहे नक्की कशाचे संकेत?

मायक्रोसॉप्ट वादाच्या भोवऱ्यात! कर्मचाऱ्यांचे कंपनीविरोधात तीव्र आंदोलन; इस्रायलला युद्धात गुप्त डेटा पुरवल्याचा आरोप
3

मायक्रोसॉप्ट वादाच्या भोवऱ्यात! कर्मचाऱ्यांचे कंपनीविरोधात तीव्र आंदोलन; इस्रायलला युद्धात गुप्त डेटा पुरवल्याचा आरोप

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
4

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Asia cup 2025 : ‘..त्याच्यासारखी कामगिरी कुणाची नाही’, अय्यरच्या समर्थनार्थ ‘या’ माजी भारतीय क्रिकेटपटूची मैदानात उडी

Asia cup 2025 : ‘..त्याच्यासारखी कामगिरी कुणाची नाही’, अय्यरच्या समर्थनार्थ ‘या’ माजी भारतीय क्रिकेटपटूची मैदानात उडी

फक्त 11 हजारात बुक करता येणार ‘ही’ कार, Tata Curvv च्या निर्मात्यांची उडाली आहे झोप

फक्त 11 हजारात बुक करता येणार ‘ही’ कार, Tata Curvv च्या निर्मात्यांची उडाली आहे झोप

पाताळलोकात केली जाते भगवान गणेशाची पूजा? जाणून घ्या काय आहे याची मनोरंजक कथा

पाताळलोकात केली जाते भगवान गणेशाची पूजा? जाणून घ्या काय आहे याची मनोरंजक कथा

भारताचा ‘द वॉल’! Rahul Dravid ‘या’ गोलंदाजाविरुद्ध खेळायला घाबरायचा; आर आश्विन समोर दिली मोठी कबुली.. 

भारताचा ‘द वॉल’! Rahul Dravid ‘या’ गोलंदाजाविरुद्ध खेळायला घाबरायचा; आर आश्विन समोर दिली मोठी कबुली.. 

घाणीने भरलेले आहेत रोजच्या आहारातील हे पदार्थ; डॉक्टरांनी सांगितल्या पेस्टसाइड्सने भरलेल्या भाज्यांची आणि फळांची नावे

घाणीने भरलेले आहेत रोजच्या आहारातील हे पदार्थ; डॉक्टरांनी सांगितल्या पेस्टसाइड्सने भरलेल्या भाज्यांची आणि फळांची नावे

पुढील आठवड्यात शेअर बाजारात होईल मोठी हालचाल, गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, जाणून घ्या

पुढील आठवड्यात शेअर बाजारात होईल मोठी हालचाल, गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, जाणून घ्या

‘Nepo Baby’, करण जोहरने मुलाला म्हटले नेपो बेबी, मिळाले असे उत्तर की बोलतीच बंद! Video Viral

‘Nepo Baby’, करण जोहरने मुलाला म्हटले नेपो बेबी, मिळाले असे उत्तर की बोलतीच बंद! Video Viral

व्हिडिओ

पुढे बघा
Beed : बीडमध्ये शिंदे गटाच्या वैद्यकीय मदत कक्ष समन्वयकांवर प्राणघातक हल्ला

Beed : बीडमध्ये शिंदे गटाच्या वैद्यकीय मदत कक्ष समन्वयकांवर प्राणघातक हल्ला

Gondia : ओव्हरलोड टिप्परमुळे रस्त्यांची वाताहत; चिरचाडबांध परिसरात नागरिक रस्त्यावर

Gondia : ओव्हरलोड टिप्परमुळे रस्त्यांची वाताहत; चिरचाडबांध परिसरात नागरिक रस्त्यावर

Mumbai Goa Highway: चिखलाचे साम्राज्य, यंदाच्या वर्षीही चाकरमान्यांची गावाकडची येण्याची वाट बिकट

Mumbai Goa Highway: चिखलाचे साम्राज्य, यंदाच्या वर्षीही चाकरमान्यांची गावाकडची येण्याची वाट बिकट

Yatmal News : पैनगंगा नदीच्या पुराने यवतमाळच्या शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

Yatmal News : पैनगंगा नदीच्या पुराने यवतमाळच्या शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कशी दुप्पट होईल? मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितला मास्टरप्लॅन

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कशी दुप्पट होईल? मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितला मास्टरप्लॅन

नवभारत – नवराष्ट्रच्या मंचावरून देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेवर दिले उत्तर

नवभारत – नवराष्ट्रच्या मंचावरून देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेवर दिले उत्तर

Kalyan : गणेशोत्सवाआधी रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी KDMC एक्शन मोडवर

Kalyan : गणेशोत्सवाआधी रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी KDMC एक्शन मोडवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.