भारताचा डंका! NASA च्या जागतिक स्पर्धेत चेन्नईच्या पोरांनी मारली बाजी; ७० कोटी भारतीयांना मिळणार स्वस्त इंटरनेट ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Space Apps Challenge : भारतीय बुद्धिमत्तेने पुन्हा एकदा जगाला आपली दखल घेण्यास भाग पाडले आहे. अमेरिकन अंतराळ संस्था नासा (NASA) ने आयोजित केलेल्या ‘२०२५ आंतरराष्ट्रीय स्पेस ॲप्स चॅलेंज’मध्ये चेन्नईच्या (Chennai) एका संघाने जागतिक विजेतेपद मिळवून इतिहास रचला आहे. या विजयामुळे केवळ भारताची मान उंचावली नाही, तर देशातील डिजिटल दरी मिटवण्यासाठी एक मोठी आशेची किरण निर्माण झाली आहे.
चेन्नईस्थित ‘फोटोनिक्स ओडिसी’ (Photonics Odyssey) या संघाने या जागतिक हॅकेथॉनमध्ये ‘मोस्ट इन्स्पायरिंग’ (सर्वाधिक प्रेरणादायी) पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. मनीष डी. आणि प्रशांत जी. यांसारख्या तरुण संशोधकांचा समावेश असलेल्या या संघाने एक असे सॅटेलाइट इंटरनेट मॉडेल तयार केले आहे, जे सध्याच्या महागड्या खाजगी सेवांना टक्कर देऊ शकते. त्यांनी या तंत्रज्ञानाकडे केवळ एक व्यवसाय म्हणून न पाहता, ती एक ‘सार्वजनिक सेवा’ (Public Utility) असावी, असा विचार मांडला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bangladesh Violence: रक्ताने माखला लोकशाहीचा चेहरा! ‘भारतामुळे’ बांगलादेशात पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न; VIDEO VIRAL
या प्रकल्पाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे भारतातील त्या ७० कोटी लोकांसाठी, जे आजही हाय-स्पीड इंटरनेटपासून वंचित आहेत. दुर्गम खेडी, डोंगाळ भाग आणि जिथे वायरने इंटरनेट पोहोचणे कठीण आहे, अशा ठिकाणी हे उपग्रह मॉडेल स्वस्त दरात ब्रॉडबँड सुविधा देऊ शकते. नासाच्या मते, भौगोलिक अडथळ्यांवर मात करून शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकासात हे मॉडेल मोठी डिजिटल क्रांती घडवून आणेल.
An Indian team’s satellite internet concept emerged as a global winner of NASA’s 2025 International Space Apps Challenge. The Chennai-based team, Photonics Odyssey, proposed a sovereign, phased-array satellite internet infrastructure to expand broadband access across remote… pic.twitter.com/B3K6Socc8N — All India Radio News (@airnewsalerts) December 19, 2025
credit : social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Deepu Das: बांग्लादेशात ‘हिंदू तरुणा’ला झाडाला टांगून जिवंत जाळले; उस्मान हादीच्या मृत्यूनंतर कट्टरपंथीयांचा नंगा नाच, पाहा VIDEO
२०२५ मधील हे ‘स्पेस ॲप्स चॅलेंज’ आतापर्यंतचे सर्वात मोठे आव्हान ठरले. जगभरातील १६७ देशांमधून ११,५०० हून अधिक प्रकल्प सादर करण्यात आले होते. नासाच्या पृथ्वी विज्ञान विभागाच्या संचालक कारेन सेंट जर्मेन यांनी भारतीय संघाचे कौतुक करताना म्हटले की, “खुल्या डेटाचा वापर करून मानवी समस्यांवर उपाय शोधणे हेच या स्पर्धेचे यश आहे.” चेन्नईच्या संघासोबतच ‘ॲस्ट्रो स्वीपर्स’ या भारतीय वंशाच्या संघानेही अवकाशातील कचरा व्यवस्थापनासाठी ‘गॅलेक्टिक इम्पॅक्ट अवॉर्ड’ जिंकून भारताचे वर्चस्व सिद्ध केले आहे. भारताच्या या विजयामुळे हे स्पष्ट झाले आहे की, भविष्यातील तंत्रज्ञान केवळ प्रयोगशाळेत नाही, तर भारतीय तरुणांच्या कल्पक डोक्यातून जन्म घेणार आहे. ७० कोटी लोकांना जगाशी जोडण्याचे हे स्वप्न आता लवकरच प्रत्यक्षात येईल, अशी आशा आहे.
Ans: चेन्नई येथील 'फोटोनिक्स ओडिसी' (Photonics Odyssey) या संघाने 'सर्वाधिक प्रेरणादायी' श्रेणीत जागतिक पुरस्कार जिंकला आहे.
Ans: भारतातील दुर्गम भागातील ७० कोटी लोकांना स्वस्त आणि जलद सॅटेलाइट इंटरनेटशी जोडणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
Ans: या संघाने 'गॅलेक्टिक इम्पॅक्ट अवॉर्ड' जिंकला असून, त्यांचा प्रकल्प अवकाशातील कचरा कमी करण्यावर आधारित आहे.






