बांगलादेशात स्टारलिंक आणणार एलॉन मस्क? मोहम्मद युनूस यांच्या भेटीदरम्यान काय घडलं?(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ढाका: बांगलादेशने नवीन राजकीय डावपेच खेळत एलॉन मस्क यांच्या स्टारलिंकला देशात आमंत्रित केले आहे. बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी दिलेल्या माहितीनुसार, एलॉन मस्क यांच्यासोबतच्या बैठकीत दोघांनी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशमध्ये स्टारलिंक लॉन्च करण्याच्या प्रक्रियेवर लवकरच काम सुरू होईल, असे यूनुस यांनी स्पष्ट केले.
युनुस यांनी गुरुवारी मस्कसोबत चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला. ५ ऑगस्ट २०२४ रोजी शेख हसीना सरकारने बांगलादेश सोडल्यानंतर मोहम्मद यूनुस सत्तेवर आले. या राजकीय उलथापालथीनंतर बांगलादेशमध्ये हिंदू समुदायावर वाढत्या अत्याचारांची नोंद झाली आहे. अल्पसंख्यांक हिंदू समुदायाला लक्ष्य करून लूटमार, घरांची तोडफोड आणि हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. भारताने यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.
Bangladesh Chief Adviser Professor Muhammad Yunus on Thursday held an extensive video discussion with @elonmusk, the owner of SpaceX, Tesla, and X, to explore future collaboration and to make further progress to introduce Starlink satellite internet service in Bangladesh. pic.twitter.com/X2cMwF4OvW
— Chief Adviser of the Government of Bangladesh (@ChiefAdviserGoB) February 13, 2025
नरेंद्र मोदी बांगलादेशचा निर्णय घेतील- ट्रम्प
दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बांगलादेशच्या मुद्द्यावर बोलताना या प्रश्नाचे उत्तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सोपवले आहे. एका पत्रकाराच्या प्रश्नावर ट्रम्प यांनी म्हटले की, “बांगलादेशातील परिस्थितीवर कोणतेही डीप स्टेट कार्यरत नाही. मोदी या मुद्द्यावर बऱ्याच काळापासून काम करत आहेत. मी आता बांगलादेशचा प्रश्न मोदींच्या हाती सोपवतो.”
शेख हसीना यांच्या सरकारच्या अपयशानंतर अमेरिकेने मोहम्मद यूनुस सरकारला मोठा झटका दिला आहे. ट्रम्प प्रशासनाने बांगलादेशला दिली जाणारी आर्थिक मदत थांबवली आहे. मोहम्मद यूनुस यांचे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि जो बायडेन यांच्याशी जवळचे संबंध असल्याचे सांगितले जाते.
अमेरिकेसोबत संबंध सुधारण्याचा युनूस यांचा प्रयत्न
याचवेळी बांगलादेशच्या नवीन राजकीय समीकरणांमध्ये एलॉन मस्कची स्टारलिंक नेटवर्थला मोठे महत्त्व प्राप्त होत आहे. इंटरनेट सेवेत सुधारण करुन देशात डिजिटल क्रांती गडवून आणण्याचा बांगलादेशचा उद्देश आहे. मात्र, ट्रम्प यांनी आर्थिक मदत थांबवल्याने यावर मोठा परिणाम होत आहे. यामुळे एलॉन मस्क यांच्याशी संपर्क साधून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न युनूस करत आहेत. अमेरिकेसोबतच्या राजकीय आणि व्यापार संबंधामुळे काही महत्त्वपूर्ण बदल होऊ शकतील, असे युनूस यांनी म्हटले आहे.
सध्या बांगलादेश राजकीय अस्थिरतेचा सामना करत असलेल्या परिस्थितीत भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचे लक्ष या भागाकडे वेधले आहे. हिंदू समुदायावरील वाढत्या हल्ल्यांमुळे भारताकडून कठोर भूमिका घेतली जात आहे.