Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोटानंतर चीनची पहिली प्रतिक्रिया; घटनेवर शोक व्यक्त करत दहशतवादाबाबत केले मोठे विधान (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मंगळवारी बीजिंगमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी दिल्ली स्फोटावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, दिल्लीतील स्फोटामुळे आम्हाला खूप दु:ख झाले आणि मोठा धक्काही बसला आहे. या स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांबद्दल आम्ही तीव्र संवेदना आहेत. तसेच जखमींना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा.
या घटनेवर इराणच्या भारतातील दूतावासाने शोक व्यक्त केला आहे. दूतावासाने भारत सरकार आणि स्फोटात मृत्यू पडलेल्यांप्रती शोक व्यक्त केला आहे. तसेच जखमींच्या बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. याशिवाय या घटनेलर इराणने दहशतवादाविरोधात भारताला पाठिंबा दिला आहे.
याच वेळी या स्फोटानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भारताचा शेजारी देश नेपाळ आणि म्यानमारने सीमेवर कडक सुरक्षा बंदोबस्त केला आहे. तसेच ब्रिटन, फ्रान्स आणि अमेरिकेने भारतातील आपल्या नागरिकांना भारतातील काही भागांमध्ये प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
विशेष करुन भारत-पाकिस्तान सीमेजवळ १० किमी पर्यंत, जम्मू-काश्मीर आणि मणिपूर राज्यांमध्ये प्रवास टाळण्यास सांगितले आहे. अमेरिका आणि फ्रान्सच्या दूतावासाने देखील आपल्या नागरिकांसाठी दिल्लीतील लाल किल्ला परिसरा व गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
या घटनेनंतर पाकिस्तानचे नाव चर्चेत असताना पाकिस्तान देखील कार स्फोटाने (Pakistan Car Blast) हादरला आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे उच्च न्यायालयाजवळ हा स्फोट झाला.मीडिया रिपोर्टनुसार, न्यायालयाबाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. या स्फोटात ११ जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. दिल्लीतील स्फोटानंतर पाकिस्तानने देखील सीमा रेषांवर सुरक्षा वाढवली होती. याअंतर्त पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी बैठकही घेतली होती.
दरम्यान पाकिस्तानने या स्फोटासाठी भारताला जबाबदार धरले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तानने कार स्फोटासाठी खारिजाइट बंडखोरांना, ज्यांना अफगाण तालिबानचे प्रॉक्सी म्हणतात त्यांना जबाबदार धरले आहे. दिल्लीतील स्फोटानंतर काही तासांनी हा स्फोट झाल्याने पाकिस्तान भारतावर गंभीर आरोप करत आहे.
Delhi Red Fort Blast : दिल्ली धमाक्यानंतर पाकिस्तान हाय अलर्टवर; राजस्थान सीमेजवळ…






