बिजिंग : चीनमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. बिजिंग गेल्या आठवड्यापासून सुरु असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे किमान ३० जणांचा मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच अनेक लोक बेपत्ता देखील झाले आहेत. चीनच्या सरकारी माध्यमंनी दिलेल्या माहितीनुसार, बीजिंगच्या उत्तरेकडच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे पूर आणि भूस्खलन झाले आहे.
सध्या लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणवण्याचे काम सुरु असून आतापर्यंत ८० हजारांहून अधिक लोकांचे विस्थापन करण्यात आले आहे. मात्र मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्ये पाण्याखाली गेले आहे. शिवाय अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. सध्या प्रशासनाने मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यास सांगितले आहे, परंतु खराब हवामानामुळे परिस्थिती अत्यंत बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या मियुन जिल्ह्यातील एका जलाशयाचे पाणी सोडण्यात आले आहे. सध्या याची पातळी वाढत चालली आहे. शिवाय अनेक नद्यांची पाण्याची पातळी देखील वाढली आहे. येत्या काही दिवसांत मुसधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
यामुळे हवामान विभाग आणि सरकारने सखल भागात राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. चीनच्या हेबेई प्रांतातील लुआनपिंग काऊंटीजवळी मियुन परिसरात मुसळधार पावसामुळे अनेक घरे वाहून गेली आहे, तसेच वीडेचे खांब देखील कोसळले आहेत.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी बीजिंग आणि आजूबाजूच्या परिसरातील नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेतला आहे. तसेच त्यांनी अग्निशमन दल, मदत आणि बचाव पथकांना बेपत्ता लोकांना शोधण्याचे आणि बचाव कार्यात गतीशीलता आणण्याचे निर्देश दिले आहे. स्थालंतरितांना आवश्यक त्या सेवा पुरवण्याचे आणि मृतांची संख्या कमी करण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करण्याचे निर्देश आपत्कालीन सेवांना देण्यात आले आहेत.
सध्या लोकांमा चीनच्या तियानजिन शहराजवळील जिझोऊ जिल्ह्यात सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. आतापर्यंत १० हजार लोकांचे विस्थापन झाले आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षाच घेता चीनने सोमवारी (२८ जुलै) रात्री आपत्कालीन सेवांना मदत कार्य सुरु करण्यास सांगितले होते. यामुळे अनेक लोकांना सुरक्षितपणे हलवण्यात आले आहे. सध्याची पूर आणि भूस्खलनाची परिस्थिती पाहता शाळा बंद करण्यात आल्या आहेत तसेच बांधकामे देखील थांबण्यात आली आहे. शिवाय पर्यटनावर देखीलबंदी घालण्यात आली आहे.