Middle East War news : तेहरान : सध्या इस्रायल आणि इराणमधील संघर्ष निवळत चालला आहे. परंतु १२ दिवस चाललेल्या या युद्धाबाबत अद्यापही अनिश्चितता कायम आहे. हे युद्ध पुन्हा भडकण्याची पुन्हा शक्यता आहे. सध्या अमेरिका इस्रायलला शस्त्रांस्त्रांचा पुरवठा करत आहे. तसेच इराणही यामध्ये मागे राहिलेला नाही. इराणला देखील त्याच्या मित्र राष्ट्रांकडून मदत मिळत आहे. यामुळे इस्रायलची चिंता वाढली आहे.
गुप्तचर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इराण आणि इस्रायलमध्ये २४ जून रोजी युद्धबंदी करण्यात आली. परंतु पुन्हा एकदा दोन्ही देशांमध्ये युद्ध भडकण्याची शक्यता आहे. यामागचे कारण म्हणजे, अधिकाऱ्यांना सांगतिले की, चीनने जमिनीवरुन हवेत मार करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा साठा इराणला पाठवला आहे. चीनच्या मदतीने इराण आपली लष्करी ताकद वाढवत आहे. यामुळे अमेरिका आणि इस्रायलमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
इस्रायलशी १२ दिवसांच्या युद्धात इराणचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय या काळात इराणने इस्रायलवर हजारो क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. यामुळे इराणचा क्षेपणास्त्रांचा साठा लक्षणीयरित्या कमी झालेला आहे. यामुळे याची कमरता भरून काढण्यासाठी चीन इराणला मदत करत आहेत. अद्याप चीनने इराणला नेमका किती क्षेपणास्त्रांच्या बॅटरीचा साठा पाठवला आहे हे स्पष्ट झालेले नाही.
चीनने सुरुवातीपासूनच इराणला पाठिंबा दर्शवला आहे. इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यांचा देखील चीनने विरोध केला होता. चीन हा इराणचा सर्वात मोठा तेल व्यापारी आहे. चीन इराणच्या कच्च्या तेलाच्या निर्यातीपैकी ९० टक्के तेल आयात करतो. यामुळे इराण आणि चीनमध्ये दृढ व्यापारी संबंध आहेत. अमेरिकेच्या विरोधाला न जुमानता चीनने गेल्या अनेकवर्षापासून इराणकडून तेल आयात केले आहे.यासाठी मलेशियाच्या देशांच्या ट्रान्सशिपमेंट हब म्हणून वापर करतो.
इस्रायल आणि इराणमध्ये 13 जून रोजी लष्करी संघर्ष सुरु झाला होता. या संघर्षामुळे मध्य पूर्वेत अशांततेचे वातावरण पसरलेले होते. या लष्करी संघर्षाची सुरुवात इस्रायलने इराणच्या अणु तळांवर, शास्त्रज्ञांवर आणि लष्करी अधिकाऱ्यांवर हल्ला करुन सुरु केली. इराणच्या अणु प्रकल्पाला रोखण्यासाठी इस्रायलने इराणवर हल्ले सुरु केले होते. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात इराणने देखील इस्रायलवर हल्ला केला. या संघर्षात इस्रायलचे 23 नागरिकांचा तर इराणच्या 100 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता.