नॉन-फूड ग्रेड तेलाचा वापर करून तूप-पनीर निर्मिती? अमोल दूध डेअरीवर छापा, छत्रपती संभाजीनगरमधून ठा साठा जप्त
या कारवाईत तूप, पनीर, साय (क्रीम) आणि रिफाइंड सोयाबीन तेलासह एकूण ८८० किलो अन्नपदार्थ, अंदाजे ₹३,१२,८८० किमतीचा साठा जप्त करण्यात आला. त्यानंतर संबंधित किरकोळ विक्री केंद्रांवरूनही ४१ किलो गायीचे तूप (₹२९,३००) जप्त करण्यात आले. अशाप्रकारे एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ₹३,४२,१८० इतकी झाली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डेअरीचे मालक दामोदर केदार यांच्या युनिटमध्ये तपासणी केली असता १० ते १२ नॉन-फूड ग्रेड सोयाबीन तेलाचे बॅरल आढळून आले. हे तेल अॅनालॉग पनीर आणि तथाकथित शुद्ध गाईचे तूप तयार करण्यासाठी वापरले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
या कारवाईत अधिकाऱ्यांनी भेसळयुक्त गाईचे तूप, तूप तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी क्रीम, पनीरचा साठा तसेच नॉन-फूड ग्रेड सोयाबीन तेल जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या दुग्धजन्य पदार्थ आणि खाद्यतेलाची एकूण किंमत ₹3,12,380 इतकी असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी संबंधित उत्पादनांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून, अहवालानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. अन्नभेसळ रोखण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
सुट्टे तूप (Ghee) – २२९ कि.ग्रॅ. (किंमत ₹१,६७,४४०)
सुट्टी साय / क्रीम (Cream) – १९९ कि.ग्रॅ. (किंमत ₹५५,७२०)
पनीर (Paneer) – १७४ कि.ग्रॅ. (किंमत ₹४५,२४०)
रिफाइंड सोयाबीन तेल – २७८ कि.ग्रॅ. (किंमत ₹४४,४८०)
एकूण ८८० कि.ग्रॅ. अन्नपदार्थ, किंमत ₹३,१२,८८० जप्त करण्यात आली.
तपासादरम्यान अमोल दूध डेअरीमधून शहरातील लक्ष्मी दूध डेअरीच्या तीन विक्री केंद्रांना पनीर आणि तुपाचा पुरवठा होत असल्याचे उघड झाले. त्यानुसार पुढील ठिकाणी तपासणी करण्यात आली:
टी.व्ही. सेंटर परिसर
कामगार चौक परिसर
श्रीराम चौक, दर्गा रोड परिसर
या तिन्ही विक्री केंद्रांवरून ४१ कि.ग्रॅ. गायीचे तूप, किंमत ₹२९,३००, जप्त करण्यात आले.
जप्त करण्यात आलेल्या सर्व अन्नपदार्थांचे नमुने मान्यताप्राप्त अन्न प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्यामुळे मे. अमोल दूध डेअरीचा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ (Forthwith) निलंबित करण्यात आला असून उत्पादन युनिटही बंद करण्यात आले आहे.
अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न उपलब्ध करून देण्यासाठी राज्यभर अन्न आस्थापनांची नियमित तपासणी सुरू राहणार आहे. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अन्न व्यवसायिकांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई केली जाईल.






