Trump Tarrif : ट्रम्प यांची भारतविरोधी आणखी एक खेळी? परदेशी चित्रपटांवर लागू केला १००% टॅक्स, काय होईल परिणाम? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Donald Trump Tarrif on Films : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेचा विषय बनत असतात. सध्या ते त्यांच्या दुसऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या काळापासून जास्तच चर्चेचा विषय बनत आहे. आपल्या विरोधी परराष्ट्र धोरणांनी जगभरातील अनेक देशांना त्यांना धक्का दिला आहे. अगदी भारतासारख्या मित्र देशाला देखील त्यांनी टॅरिफचा (Tarrif) झटका दिला आहे.
नुकतेच ट्रम्प यांनी आणखी एक निर्णय जाहीर केली आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेबाहेर बनवल्या जाणाऱ्या चित्रपटांवर १००% कर लागू केला आहे. तसेच त्यांनी परदेशी फर्निचर कंपन्यांवरही मोठ्या प्रमाणात टॅरिफ जाहीर केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर या संदर्भात एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी म्हटले आहे की, अमेरिकेचा चित्रपट निर्मिती व्यवसाय इतर देशांनी लहान मुलाकडून कँडी हिसकावून घेतात तसा घेतला आहे. यामुळे त्याचा गंभीर परिणाम अमेरिकेला भोगावा लागत आहे. विशेष करुन त्यांनी कॅलिफोर्नियातील हॉलीवूडचा उल्लेख करत राज्याच्या राज्यपाल आणि सरकारने अमेरिकेचे नुकसान केले असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. त्यांनी पुढे म्हटले की, पण आता ही समस्या लवकरच सुटेल. यासाठी मी परदेशी चित्रपटांवर १००% टॅरिफ लादणार आहे.
टॅरिफ कसा लावला जाणार?
अमेरिकन वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटांवर कशाप्रकारे टॅरिफ लावला जाईल हे अद्याप ट्रम्प यांनी स्पष्ट केलेले नाही. हे टॅरिफ नेमकं चित्रपटाच्या निर्मिती खर्चावर लागू होईल की, बॉक्स ऑफिसच्या उत्पन्नावर लागू होईल, की परदेशात किती बनवला गेला यावर लागू होईल हे सर्व अस्पस्ट आहे.
काय होईल याचा परिणाम?
या टॅरिफचा अमेरिकेवर उलटा परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे इतर देशही अमेरिकन चित्रपटांवर टॅरिफ लादू शकतात. यामुळे तिकीट विक्रीवर परिणाम होऊ शकतो.
भारतावर काय होणार परिणाम?
डोनाल्ड ट्रम्प यांनी हा कर भारतीय चित्रपटांवरही लागू केला आहे. पण यामुळे भारताच्या चित्रपट उद्योगांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अमेरिकेत भारतीय चित्रपट व्यवासाय २०२४ मध्ये २० दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. पण या १०० टक्के शुल्कामुळे भारतीय चित्रपटांच्या आंतरराष्ट्रीय उत्पादनांत घट होण्याची शक्यता आहे. गेल्या काही काळात अमेरिकेत भारतीय चित्रपटांबाबत लोकप्रियतेते वाढ होत आहे. यामुळे भारताच्या चित्रपट उद्योगांनी चांगली कमाई केली आहे. पण ट्रम्प यांच्या या नव्या घोषणेमुळे भारतीय चित्रपटांना नुकसान होण्याची शक्यता आहे.
याच वेळी ट्रम्प यांनी आणखी एका पोस्टमध्ये फर्निचर उत्पादनांवर टॅरिफ लादण्या संदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे की, चीन आणि इतर देशांमुळे उत्तर कॅरोलिनाच्या फर्निचर व्यवसायांवरही परिणाम झाला आहे. यामुळे अमेरिकेबाहेर फर्निचर बनवणाऱ्या देशांवर मी मोठ्या प्रमाणात टॅरिफ लागू करणार आहे.
प्रश्न १. डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कशावर कर लादला आहे?
डोनाल्ड ट्रम्प यांनी आता परदेशी चित्रपटांवर आणि परदेशी फर्निचर उत्पादनांवर कर लागू केला आहे.
प्रश्न २. काय होईल चित्रपटांवरील टॅरिफचा भारतावर परिणाम?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या परदेशी चित्रपांवरील टॅरिफमुळे भारताच्या चित्रपट उद्योगाला धक्का बसण्याची शक्यता आहे.
Typhoon Bualoi : टायफून बुआलोईचा व्हिएतनामला तडाखा; पुरामुळे १० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू