ट्रम्पचे सूर पुन्हा बदलले? एकीकडे पंतप्रधान मोदींचे कौतुक दुसरीकडे EU ला भारतावर १००% टॅरिफ लागू करण्याचे आवाहन (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
India US Relations : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड (Donald Trump) ट्रम्प यांनी पुन्हा आपले सूर बदलेल आहे. ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींशी (Narendra Modi) चर्चेची इच्छा व्यक्त केली असताना दुसरीकडे युरोपियन युनियनला (EU) भारतावर १००% कर (Tarrif) लागू करण्याचे आवाहन केले आहे. ट्रम्प यांनी चीनवरही इतकाच कर लादण्यास सांगितले आहे. त्यांच्या या विधानेन संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केले आहे.
EU ला रशियाच्या मोठ्या भागीदारांवर कर लागू करण्याचे आवाहन
एकीकडे ट्रम्प भारतासोबत व्यापारातील अडथळे दूर करण्यावर चर्चा सुरु असल्याचे सांगतात. तसेच चांगले मित्र म्हणून पंतप्रधान मोदींचे कौतुकही करतात, परंतु EU कडे केलेल्या त्यांच्या या अपील पुन्हा एक खळबळ उडाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन युनियनला रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या सर्वात मोठ्या भागीदार देशांवर म्हणजेच भारत आणि चीनवर १००% पर्यंत कर लागू करण्यास सांगितले आहे. त्यांनी म्हटले आहे की, रशिया युक्रेन युद्ध (Russia Ukriane War )संपवण्यासाठी मॉस्कोवर दबाव गरजेचा आहे. यासाठी एकत्रपण प्रयत्न झाले पाहिजेत.
मध्यपूर्वेत पुन्हा अस्थिरता! जगाचे लक्ष नेपाळकडे असताना इस्रायलने ‘या’ देशासोबत सुरु केले युद्ध
ट्रम्प यांची EU च्या अधिकाऱ्यांशी चर्चा
ट्रम्प यांनी मंगळवारी (०९ सप्टेंबर) भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापार चर्चा सुरु असल्याचे म्हटले होते. तसेच त्यांनी पंतप्रधान मोदींशी चर्चेची इच्छा देखील व्यक्त केली होती. याच दरम्यान मंगळवारी त्यांनी युरोपियन युनियनसोबत वॉशिंग्टनमध्ये युरोपियन युनियनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली.
यावेळी ट्रम्प यांनी रशियाच्या युद्ध निधीला रोखण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा केली. एका अमेरिकेन अधिकाऱ्याने म्हटले की, अमेरिका रशियावर तात्काळ कारवाईसाठी तयार आहे, परंतु यासाठी युरोपियन युनियनची भागीदारी देखील महत्वाची आहे. युद्ध संपवण्यासाठी मॉस्कोवर दबाव वाढवण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
ट्रम्प भारतावर कर लादणार का?
सध्या ट्रम्प यांनी भारतावर ५०% कर लागू केला आहे. यातील २५ टक्के कर आणि २५ टक्के अतिरिक्त दंड आहे. तर दुसरीकडे ट्रम्प यांनी चीनवर ३० टक्के कर लागू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी युरोपियन देशांकडे शुल्क आणखी वाढवण्याची मागणी केली आहे. यामुळे दोन्ही देशातून आयात होणाऱ्या वस्तूंवर अमेरिकेच्या शुल्कात वाढ होऊ शकते असे म्हटले जात आहे. युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अडचणी वाढत आहे, यावर व्हाइट हाउसने नराजी व्यक्त केली आहे. अशा परिस्थिती ट्रम्प यांनी शुल्क वाढीची मागणी केली आहे.
रशियावर निर्बंध लादण्याचे धमकी
याशिवाय ट्रम्प यांनी रशियावर कठोर निर्बंध लादण्याचीही धमकी दिली आहे. तसेच मॉस्कोकडून तेल खरेदी करण्याऱ्या देशांवर कर लादून हे निर्बंध लादले जातील असे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी यामध्ये केवळ भारताला सामील केले जात होते, आता ट्रम्प यांनी चीनशी देखील पुन्हा शत्रूत्व घेतले आहे. ट्रम्प यांच्या या आवाहानाने पुन्हा एकदा जागतिक स्तरावर खळबळ उडाली आहे.
FAQs (संबंधित प्रश्न)
ट्रम्प यांनी युरोपियन युनियकडे काय मागणी केली?
डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन युनियनकडे रशियाच्या मोठ्या तेल भागीदारांवर म्हणजेच भारत आणि चीनवर १००% कर लागू करण्याची मागणी केली आहे.
ट्रम्प यांनी भारताच्या शुल्कात वाढ करण्याचा मागणी का केली?
ट्रम्प यांनी EU ला म्हटले आहे की, रशिया आणि युक्रेन युद्ध थांबवण्यासाछी मॉस्कोवर दबाव गरजेचा आहे. यासाठी त्यांच्या भागीदारांवर शुल्क लादले तर युद्ध तात्काळ थांबेल.