अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची नाराजी वाढली! डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचा आगामी दौरा केला रद्द? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
India America Realations : गेल्या काही काळापासून अमेरिका आणि भारताच्या संबंधामध्ये कटुता निर्माण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतवर लावलेल्या ५०% टॅरिफमुळे (Tarrif) हा वादा वाढला आहे. दरम्यान आता ट्रम्प यांनी भारत दौराही रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प भारतात होणाऱ्या क्वाड परिषदेत सहभाग होणार होते. मात्र आता ट्रम्प यांनी हा दिल्ली दौरा रद्द केला आहे. न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प यांच्या कार्यालयाच्या सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
अहवालानुसार, ट्रम्प यांनी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) अमेरिका भेटीदरम्यान वर्षाच्या अखेरीस भारतात येणार असल्याची माहिती दिली होती. पण आता त्यांनी हा दौरा रद्द केला आहे. सध्या यावर दोन्ही देशांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. पण ट्रम्प यांनी दिल्ली दौरा रद्द केल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.
मोठी दुर्घटना! पश्चिम आफ्रिकेच्या किनाऱ्यावर उलटली बोट; समुद्रात बुडून ६० हून अधिक लोकांचा मृत्यू
यंदा २०२५ च्या अखेरिस क्वाड शिखर परिषदेचे आयोजन भारत करणार आहे. यापूर्वी जानेवारी २०२५ मध्ये अमेरिकेत क्वाडच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली होती. ट्रम्प प्रशासनाने या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी यंदाची परिषदत भारतात घेण्याचे निश्चित झाले. डिसेंबरमध्ये ही परिषद होणार आहे. पण सध्याचे अमेरिका आणि भारताचे संबंध पाहता ट्रम्प या परिषदेत सहभागी होणार की नाही?असा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
ट्रम्प यांच्या बारतावरील टॅरिफने भारत आणि अमेरिकेचे संबंध ताणले गेले आहेत. दोन्ही देशांमध्ये व्यापारी तणावात वाढ झाली आहे. सध्या ट्रम्प भारतावर रशियाकडून तेल खरेदी थांबवण्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. ट्रम्प यांनी सतत भारतावर रशियाला युक्रेनविरुद्धच्या युद्धात आर्थिक मदत केल्याचा आरोप केला आहे.
पण भारताने ट्रम्प यांचे हे आरोप फेटाळत त्यांच्या टॅरिफला तीव्र विरोध केला आहे. शिवाय भारत आणि पाकिस्तान मध्ये अमेरिकेने मध्यस्थी करुन युद्धबंदी केल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. मात्र भारताने कोणत्याही तिसऱ्या देशाचा पाकिस्तानसोबतच्या युद्धबंदीत सहभाग नाकारला आहे.
न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या अहवालानुसार, ट्रम्प भारताच्या या कृतीवर नाराज आहेत. तसेच त्यांनी पंतप्रधान मोदींनाही कॉल करण्याचा प्रयत्न केला होता. पण पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांचा फोन उचलला नाही. यामुळेही ट्रम्प पंतप्रधान मोदींवर नाराज असल्याचे म्हटले जात आहे. तसेच पंतप्रधान मोदी चीनच्या दौऱ्यावर असून यावेळी ते तियानजिनमध्ये होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेत सहभागी झाले आहे. यामुळे देखील ट्रम्प नाराज असल्याचे काही तज्ज्ञांनी म्हटले आहे. यापूर्वी दोन्ही नेत्यांनी १७ जून रोजी फोनवरुन संवाद साधला होता. याच वेळी कॅनडातील G-7 परिषदेत दोन्ही नेत्यांची भेट होणार होती. पण ट्रम्प परिषदेतून लवकर परतले. यामुळे ही भेट होऊ शकली नाही.