वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) स्वत:ला लवकरच रिपब्लिकन पार्टीच्या (Republican Party) अध्यक्ष पदाचा (President) उमेदवार म्हणून जाहीर करू शकतात. मध्यावधी निवडणुकीदरम्यान ट्रम्प स्वयंघोषणेद्वारे सर्वांना चकीत करू शकतात. अमेरिकन संसदेवरील (American Parliament) हल्ल्याच्या सुनावणीदरम्यान ट्रम्प यांचे नाव चर्चेत आले आहे. त्यांच्यावर हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे. त्यामुळेच ट्रम्प तिरपी चाल खेळण्याची तयार करत आहेत.
सध्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांमध्ये (Trump Suporter) जबरदस्त उत्साह दिसून येत आहे. त्यातच ८० टक्के रिपब्लिकन सदस्यांनी ट्रम्प यांना पाठिंबा दिला आहे. त्यानुसार ट्रम्प घोषणा करतील तेव्हा त्यांच्या टीमलादेखील त्याची साधी कल्पनाही नसेल. सामान्यपणे राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या एक वर्ष आधी उमेदवारांची घोषणा होते. ट्रम्प २०२४ मधील निवडणुकीसाठी दोन वर्षे आधीच स्वत:ची उमेदवारी जाहीर करून पक्षावरील पकड आणखी मजबूत करू इच्छितात.