चीनमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. चीनच्या शिनजियांगमध्ये भूंकपाचे (China Earthquake) धक्के जाणवले, ज्याची तिव्राता 7.2 रिस्टर स्केल इतकी मोजण्यात आली. चीन पाठोपाठ आता भारतातही भूंकपाचे धक्के जाणवले. दिल्ली-एनसीआरमध्ये तसेच देशाच्या इतर भागातही भुंपकपाचे धक्के जाणवले. चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेनुसार, स्थानिक वेळेनुसार रात्री उशिरा सुमारे दोन भूकंप झाले. या भूकंपात सहा जण जखमी झाले असून चार जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. भूकंपामुळे घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये 47 घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली असून 78 घरांचे नुकसान झाले आहे.
[read_also content=”मिड वीक एलिमिनेशनमध्ये बिग बॉसच्या घरातून काढले विकी जेनला, हे खेळाडू टॉप – 5 मध्ये https://www.navarashtra.com/movies/vicky-jain-was-kicked-out-of-the-bigg-boss-house-in-the-mid-week-elimination-this-player-in-the-top-5-bigg-boss-17-grand-finale-ankita-lokhande-500758.html”]
चीनमधील भूकंपाचा प्रभाव भारतातही जाणवला. दिल्ली-एनसीआरमध्ये तसेच देशाच्या इतर भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. बराच वेळ भूकंपामुळे पृथ्वी हादरत राहिली. भूकंप इतका जोरदार होता की थंडी असूनही लोक घराबाहेर पडले आणि मोकळ्या ठिकाणी पोहोचले. 2024 मध्ये भारतात झालेला हा दुसरा भूकंप आहे. यापूर्वी 11 जानेवारीला दिल्ली-एनसीआरसह जम्मू-काश्मीरमध्ये भूकंप झाला होता. ज्याचे केंद्र अफगाणिस्तानातील फैजाबाद येथे होते.
भारतासोबतच किर्गिस्तान आणि कझाकिस्तानमध्येही भूकंपाचा प्रभाव दिसून आला. या देशांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. रशियन वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार कझाकची राजधानी अल्माटी येथील लोक भूकंपाच्या भीतीने घराबाहेर पडले. किर्गिस्तान आणि शिनजियांग सीमेवर अनेक घरांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. अनेक घरे जमीनदोस्त झाली. त्यामुळे काही जण गंभीर जखमी झाले आहेत.