मैत्री पुन्हा ट्रॅकवर...! Trump च्या 'या' व्यक्तव्यानंतर Musk ने मानले आभार, म्हणाले... (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Trump-Musk news in Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क (Elon Musk) यांच्यातील तणाव पुन्हा निवळताना दिसत आहे. सध्या दोघे १९ नोव्हेंबर रोजी सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या सन्मानार्थ झालेल्या डिनरमध्ये एकत्र दिसून आले. यानंतर अमेरिकेच्या राजकारणात आणि व्यावसायिक क्षेत्रात मोठा खळबळ उडली आहे.
अमेरिकन राजकारणात मोठा ट्विस्ट! Trump-Musk मध्ये पुन्हा मैत्री…पण या यु-टर्न मागचं खरं कारण काय?
पण व्हाइट हाउसमध्ये नुकत्याच झालेल्या डिनरमध्ये दोघे एकत्र दिसून आले. यावरुन दोघांमधील मैत्री पुन्हा ट्रॅकवर येताना दिसत आहे. या डिनर वेळी ट्रम्प यांनी मस्क यांना हसत मजेशीर अंदाजात तीन वेळा हाक मारली. यानंतर त्यांनी म्हटले की, एलॉन तू खूप लकी आहे की मी तुझ्यासोबत आहे! यानंतर ट्रम्प यांनी मस्क यांना असेही म्हटले की, यावर तू मला कधी ‘Thank You’ ही म्हटले नाही. ट्रम्प यांच्या या विधानाने डिनरदरम्यान हास्याचा स्फोट झाला होता.
ट्रम्प यांच्या या विधानानंतर काही तासांना मस्क यांनी सोशल मीडियावर ट्रम्पचे आभार मानणारी पोस्ट केली. मस्क यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे अमेरिका आणि जगासाठी केलेल्या कामाचे आभार मानतो. यासोबत मस्क यांनी डिनर दरम्यानचा फोटोही शेअर केला आहे.
या डिनरमध्ये सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, एनवीडियाचे सीईओ जेन्सेन हुआंग आणि एलॉन मस्क उपस्थित होते. या डिनरदरम्यान ट्रम्प यांनी नव्या टॅक्स बिलावरही चर्चा केली. हे बिल अमेरिकेतील वाहनांसाठी विशेष सवलती देणार आहे.
I would like to thank President Trump for all he has done for America and the world pic.twitter.com/KdK9VC2MLs — Elon Musk (@elonmusk) November 19, 2025
ट्रम्प-मस्कमधील हा अंदाज पाहून अनेकजण आश्चर्यात आहेत. सध्या दोघांची मैत्री पुन्हा ट्रॅकवर येत असल्याचा चर्चांणा उधाण आले आहे. जानेवारी ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर मस्क यांना त्यांच्या सरकारमध्ये डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशिएन्सी (DOGE) चे प्रमुख बनवले होते. परंतु दोघांमधील वादामुळे मस्क यांनी राजीनामा दिला.
एकेकाळी दोघांमध्ये सोशल मीडियावर तीव्र शाब्दिक युद्ध झाले होते. दोघांनी एकमेकांवर हल्ला चढवला होता. मस्क यांनी ट्रम्प यांच्या बिग बन ब्युटीफुल धोरणावर तीव्र टीका केली होती. यामुळे ट्रम्प यांनी एलॉन मस्कला त्यांच्या प्रोजेक्टचा सरकारी निधी बंद करण्याी धमकी दिली होती. तर मस्क यांनी जेफ्री एपस्टिन (Jeffery Epstine) प्रकरणावरुन ट्रम्पवर गंभीर आरोप केले होते.
Trump-Mamdani च्या भेटीची तारीख ठरली निश्चित; राजकीय तणावानंतर पहिलीच प्रत्यक्ष चर्चा
Ans: डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमध्ये झालेल्या डिनरदरम्यान मजेशीर अंदाजात तीन वेळा हाक मारली, त्यांनी म्हटले की, एलॉन तू खूप लकी आहेस की मी तुझ्यासोबत आहे! पण तू याबद्दल मला कधी थॅंक्यू म्हटले आहे का असे म्हटले
Ans: ट्रम्प यांच्या या विधानानंतर काही तासांना मस्क यांनी सोशल मीडियावर ट्रम्पचे आभार मानणारी पोस्ट केली. मस्क यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे अमेरिका आणि जगासाठी केलेल्या कामाचे आभार मानतो.
Ans: डोनाल्ड ट्रम्प यांच्या बिग ब्युटीफूल धोरणांवर मस्क यांनी उघडपणे टीका केली होती. ज्यामुळे यामुळे ट्रम्प-मस्कमध्ये वाद झाला होता.






